आपली त्वचा, विशेषतः चेहऱ्यावरील त्वचा, अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याची काळजी घेताना विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सुंदर आणि निरोगी चेहरा मिळवण्याच्या नादात अनेकदा लोक घरगुती उपायांवर किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ट्रेंड्सवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. मात्र हे उपाय नेहमी सुरक्षितच असतील असे नाही. काही गोष्टी अशा असतात की त्या चेहऱ्यावर लावल्यास फायदा न होता उलट नुकसान होऊ शकते.
सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका 'या' गोष्टी (फोटो सौजन्य: Pinterest)
टूथपेस्ट: पिंपल्स सुकण्यासाठी अनेकजण टूथपेस्ट लावतात, पण त्यामध्ये असलेले फ्लोराइड, बेकिंग सोडा आणि मेंथॉल यांसारखे घटक त्वचेवर जळजळ निर्माण करून तिला लाल करू शकतात.
लिंबाचा रस: लिंबामध्ये सिट्रिक ॲसिड असते, जे त्वचेचे ब्लीचिंग करू शकते. हीच गोष्ट चेहऱ्यावर लावल्यास जळजळ, पुरळ आणि टॅनिंग होऊ शकते, विशेषतः उन्हात गेल्यावर.
गरम तेल: चेहऱ्यावर गरम तेल लावल्याने स्किनचे पोर्स बंद होऊ शकतात आणि त्यामुळे पिंपल्स वाढू शकतात. म्हणून नेहमी हलके, थंड आणि नॉन-कॉमेडोजेनिक तेल वापरणे आवश्यक आहे.
बॉडी लोशन: बॉडी लोशनमध्ये असे घटक असतात जे जाड त्वचेसाठी तयार केलेले असतात. चेहऱ्यासाठी ते खूप जड ठरतात आणि पोर्स ब्लॉक करू शकतात.
बेकिंग सोडा: याचा पी एच लेव्हल त्वचेशी जुळत नाही. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक आर्द्रता नष्ट होऊ शकते आणि दीर्घकाळ वापरल्यास त्वचा कोरडी आणि अधिक संवेदनशील होऊ शकते.