क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! (Photo Credit- X)
IND vs AUS ODI Series 2025: भारतीय क्रिकेट संघाचे चाहते आतुरतेने वाट पाहत असलेली मोठी बातमी समोर आली आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत पुनरागमन जवळजवळ निश्चित झाले आहे. १९ ऑक्टोबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा ४ ऑक्टोबर रोजी होण्याची अपेक्षा आहे.
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२५ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित आणि कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाहीत. या मोठ्या ब्रेकनंतर दोघेही आता पुन्हा एकदा एकदिवसीय सामन्यांसाठी (ODI) उपलब्ध असतील.
⭐️Rohit Sharma and Virat Kohli are set to be back in action The two talismans of Indian cricket will be part of the one-day squad for the three-match series in Australia The BCCI is expected to announce the squad on Saturday#BCCI #CricketTwitter #IndianCricket pic.twitter.com/XRv8JUQR4K — Cricbuzz (@cricbuzz) October 3, 2025
भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका (शेवटचा सामना १४ ऑक्टोबरला) संपल्यानंतर अवघ्या चार दिवसांत ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या कामाचा ताण विचारात घेतला जात आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळणारे सलामीवीर शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
२०२५ च्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात दुखापत झालेला अष्टपैलू हार्दिक पंड्या या दौऱ्यासाठी अनुपलब्ध असेल. त्याच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संघात संधी मिळू शकते.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. हा संपूर्ण दौरा १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान चालेल.