आज अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी भारताचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये 3 लाखपासून ते 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नासाठी 5 % कर, 7 ते 10 लाखाच्या उत्पन्नासाठी 10 टक्के तर, 20 ट्क्के कर 12 ते 15 आणि 15 लाखाच्यावरील उत्पन्नासाठी 30% कर लागू करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात इनकम टॅक्समध्ये कोणतीच सूट मिळालेली नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की, जगातील काही देशांमध्ये इनकम टॅक्स लागू होत नाही. ( फोटो सौजन्य: iStock)
चला तर मग जाणून घेऊयात असे कोणते देश आहेत जिथे इनकम टॅक्स लागू होत नाही.
UAE: संयुक्त अरब अमिरातीमध्ये नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक कर घेतला जात नाही. या ठिकाणी सरकार अप्रत्यक्ष कर वसूल करते. या देशाची अर्थव्यवस्था तेल वाहतूक आणि पर्यटनावर चालते.
मोनॅको: युरापमधील मोनॅको देश आकाराने जगातील दुसरा लहान देश मानला जातो. या सार्वभौम देशात नागरिकांकडून कोणताही आयकर वसूल केला जात नाही.
कतार: कतार हो देश छोटा असाला तरी व्यावसायिक दृष्ट्या खूप समृद्ध आहे. या देशातील नागरिकांकडूनही कर वसूलण्यात येत नाही.
ओमान: आखाती देश ओमानमध्येही लोकांना आयकर भरावा लागत नाही. तेल आणि वायूमुळे ओमान मजबूत मानले जाते.
ब्रुनेई: इस्लामिक राज्य ब्रुनेई हा जगातील दक्षिण पूर्व आशियातील एक देश आहे ज्यामध्ये तेलाचे प्रचंड साठे आहेत. या देशातील नागरिकांना कोणताही आयकर भरावा लागत नाही.
सौदी अरेबिया: सौदी अरेबियामध्येही लोकांना आयकर भरावा लागत नाही. येथे थेट कर रद्द करण्यात आला आहे. या देशातील लोकांना त्यांच्या उत्पन्नाचा एक भागही कर म्हणून द्यावा लागत नाही.
कुवेत: कुवेतमध्येही सरकार करमुक्त कर देऊन जनतेला दिलासा देते. येथे वैयक्तिक आयकर लागू होत नाही. येथे देशाला उत्पन्न तेलाच्या विक्रीतून मिळते.