फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी तिथी आणि शुक्ल पक्षाची एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. कारण ही तिथी भगवान विष्णू यांना समर्पित आहे. पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पापंकुश एकादशी असे म्हणतात. यंदा पापंकुश एकादशी शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी आहे. या एकादशीला पापांचा नाश करणारी एकादशी असेही म्हटले जाते. अमावस्या ही महिन्यातून दोन वेळा येते पहिली अमावस्येनंतर आणिी दुसरी पौर्णिमेनंतर. पापंकुश एकादशीला पूजेसाठी काय आहे मुहूर्त आणि एकादशीचे महत्त्व, जाणून घ्या
पापंकुश एकादशी ही आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये या एकादशीची सुरुवात गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.10 वाजता होणार आहे. तर शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.32 वाजता या तिथीची समाप्ती होईल. उद्यतिथीनुसार या एकादशीचे व्रत 3 ऑक्टोबर रोजी पाळले जाणार आहे. तसेच पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त सकाळी 11.46 ते दुपारी 12.34 पर्यंत आहे.
पापंकुश एकादशी म्हणजे पापांचे निवारण. या एकादशीला भगवान विष्णूची पूजा करणे आणि व्रत करणे सर्व पापांचा नाश करते, मन शुद्ध करते, सुख आणि समृद्धी आणते आणि मृत्युनंतर मोक्ष प्रदान करते. याशिवाय, ही एकादशी मानवाला इच्छित फळे देणारी आणि स्वर्गप्राप्ती करणारी मानली जाते. या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीला यमलोकात यातना सहन कराव्या लागत नाहीत आणि तिन्ही पिढ्यांना पापांपासून मुक्ती मिळते.
पापंकुश एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला यमलोकात दुःख भोगावे लागत नाही. त्यासोबतच आपण व्यस्थितरित्या पूजा केल्यास मन शुद्ध होते आणि वाईट कर्मांपासून मुक्तता मिळते. एकादशीचे हे व्रत पाळल्याने भक्ताला सुख, समृद्धी आणि संपत्तीची प्राप्ती होते. या व्रताच्या दिवशी मोक्ष आणि स्वर्ग प्राप्त होतो असे म्हटले जाते. पापंकुश एकादशीचे व्रत चंद्राच्या अशुभ प्रभावांना देखील दूर करते.
पापंकुश एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या पद्मनाभ रूपाची पूजा केली जाते. पापंकुश एकादशीचे व्रत करणाऱ्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि त्याला पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. पापंकुश एकादशीला ब्राह्मणांना जेवण द्यावे आणि दान करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)