केएल राहुल(फोटो-सोशल मीडिया)
KL Rahul’s great performance in Test cricket : अहमदाबाद येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी खेळली जात आहे. या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर आटोपला. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या डावाची सुरवात केली. या सामन्यात भारताने पहिल्या डावात दिवसाअखेर २ बाद १२१ धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताचा भरवशाचा सलामीवीर केएल राहुलने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावून आपला प्रभावी फॉर्म दाखवून दिला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी राहुलने ११४ चेंडूत नाबाद ५३ धावा फटकवल्या. या खेळीसह त्याने कसोटी क्रिकेटमधील एक विशेष कामगिरी केली आहे. हा त्याच्या कारकिर्दीतील २६ वा ५० प्लस धावांचा स्कोअर ठरला आहे.
हेही वाचा : IND vs WI 1st Test : ध्रुव जुरेलचा हवेत सूर! वेस्ट इंडीजविरुद्ध टिपला जादुई झेल; व्हिडिओ व्हायरल
भारतात खेळताना राहुलने एकदा चांगली कामगिरी केली आहे. घरच्या मैदानावर हा त्याचा १२ वा ५० प्लस धावांचा स्कोअर ठरला आहे. तथापि, या १२ डावांमध्ये त्याने फक्त एक शतक लगावले आहे. भारतीय डावाची सुरुवात करण्यासाठी केएल राहुलची सातत्य महत्त्वाचे होते आणि त्याने मैदानावर उभे राहून शानदार अर्धशतक झळकवून दाखवून दिले.
यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुलने भारतीय डावाची शानदार सुरवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावा जोडल्या. ज्यामुळे संघाला मजबूत पाया रचला गेला. यशस्वी जयस्वालने ५४ चेंडूत ३६ धावा करून तो बाद झाला, तर राहुल एका टोकाला टिकून राहिला आणि आणि त्याने अर्धशतक झळकवले. तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा साई सुदर्शनही ७ धावा करून झटपट बाद झाला. पहिल्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस भारताने २ बाद १२१ धावा केल्या होत्या, केएल राहुल आणि शुभमन गिल नाबाद राहिले.
केएल राहुलच्या या अर्धशतकासह, तो आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांच्या यादीत सामील झाला आहे.या कामगिरीमुळे केएल राहुल आता भारतीय कसोटी इतिहासातील दिग्गज सलामीवीरांमध्ये स्थान मिळवले आहे. त्याच्या फलंदाजीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो मोठ्या प्रसंगी संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्यास सक्षम आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणारे सर्वाधिक खेळाडू