(फोटो सौजन्य: thepalaceonwheels.org
भारताची रेल्वे फक्त प्रवासाचे साधन नाही, तर पर्यटन आणि ऐश्वर्याचा अनुभव देणारे माध्यमही आहे. साध्या गाड्यांमध्ये आपण आपल्या खिशानुसार तिकिट घेतो आणि प्रवास पूर्ण करतो, पण काही ट्रेन अशा आहेत ज्या प्रवाशांना राजेशाही अनुभव देतात. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध आणि महागडी ट्रेन म्हणजे पॅलेस ऑन व्हील्स. ही ट्रेन खरोखरच एका राजवाड्यासारखी आहे, म्हणूनच तिचं नाव “पॅलेस ऑन व्हील्स” ठेवण्यात आलं आहे.
कॉफी, साऊथ इंडियन पदार्थांसह भारतीय एअरपोर्टवर प्रवासी ‘हे’ पदार्थ खाणे अधिक पसंत करतात
प्रवासाचा खर्च
या ट्रेनमध्ये बसणे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही, कारण तिचे तिकीट लाखोंमध्ये जाते. यातील भाडं सिझननुसार बदलतं. लो सीझन (एप्रिल व सप्टेंबर) मध्ये डबल ऑक्युपन्सी प्रति व्यक्ती भाडं सुमारे 5.36 लाख रुपयांपासून सुरू होतं. तर पीक सीझन (ऑक्टोबर ते मार्च) मध्ये हे भाडं 8 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतं. प्रेसिडेन्शियल सूट, सुपर डिलक्स, सिंगल आणि डबल ऑक्युपन्सी अशा विविध श्रेणींमध्ये प्रवासाची सोय उपलब्ध आहे.
प्रवासाचा रूट
ही आलिशान गाडी दिल्लीतील सफदरजंग स्थानकावरून सुरू होते आणि राजस्थानच्या विविध शहरांमध्ये फिरवते. जयपूर, सवाई माधोपुर, चित्तौडगड, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर, भरतपूर अशी शहरे पाहायला मिळतात. शेवटी प्रवास आग्रा (ताजमहल) येथे संपतो आणि पुन्हा दिल्लीला परततो. हा प्रवास 7 रात्री व 8 दिवसांचा असतो आणि यात इतिहास, निसर्ग व सांस्कृतिक वारसा यांचा संगम अनुभवता येतो.
ट्रेनमधील सुविधा
पॅलेस ऑन व्हील्सला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठा मान मिळालेला आहे. Conde Nast या पर्यटन मासिकाने तिला जगातील दुसरी सर्वोत्तम आलिशान ट्रेन ठरवलं आहे. या ट्रेनमध्ये –
24 तास उपलब्ध असलेली सर्व्हिस
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा
बुकिंग कसं करायचं?
या ट्रेनची बुकिंग सामान्य गाड्यांसारखी नाही. तुम्हाला 65 दिवस आधी बुकिंग करावी लागते. त्यावेळी एकूण भाड्यापैकी 25% रक्कम जमा करून बुकिंग करता येतं, मात्र उरलेली 75% रक्कमही प्रवासाच्या 65 दिवस आधी भरणं आवश्यक असतं.