'एक राज्य, एक निवडणूक' नाहीच; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात? (फोटो सौजन्य-X)
पेठ वडगाव : पेठ वडगाव पालिकेच्या निवडणूक रिंगणात नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवकपदासाठी ४८ उमेदवारांचे अर्ज निवडणूक रिंगणात राहिले. काही प्रभाग वगळता ही निवडणूक अखेर दुरंगीच ठरली आहे. बहुतांशी यादव आघाडी विरुद्ध युवक क्रांती आघाडी अशी लढत राहिली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सकल मराठा सेना पक्षाचे अध्यक्ष प्रल्हाद तालुगडे यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमुळे नगराध्यक्षपदाची लढत तिरंगी ठरली आहे.
निवडणूक रिंगणात राहिलेले उमेदवारी अर्जामध्ये नगराध्यक्षपदासाठी युवक क्रांती आघाडीतून जनसुराज्य शक्ती पक्षातून युवक क्रांती आघाडीच्या नेत्या प्रविता शिवाजीराव सालपे, यादव आघाडीतून यादव आघाडीच्या नेत्या विद्याताई पोळ, सकल मराठा सेना पक्षातून या पक्षाचे अध्यक्ष प्रल्हाद तालुगड यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक रिंगणात राहिला.
शहरातील एकूण दहा प्रभागातील नगरसेवक पदासाठी- प्रत्येकी दोन उमेदवाराप्रमाणे- प्रभाग एक मधून- यादव आघाडीतून – सुरेखा महादेव अनुसे, संदीप पांडुरंग पाटील विरुद्ध युवक क्रांती आघाडीतून नाजमीन तौसीफ खाटीक, संतोष बबनराव चव्हाण, अपक्ष- ललिता संतोष माळी अशी लढत आहे.
प्रभाग दोनमध्ये – यादव आघाडीतून धनश्री इंद्रजीत पोळ, मिलिंद लमुवेल सनदी विरुद्ध युवक क्रांती आघाडीतून समृद्धी सचिनकुमार पोळ जनसुराज्य शक्ती, धीरज रामचंद्र पोवार- जनसुराज्य शक्ती, अपक्ष- राजवर्धन बाबासो पाटील.
प्रभाग तीनमध्ये – यादव आघाडीतून निवास वसंत धनवडे, सारिका धनंजय गोंदकर विरुद्ध युवक क्रांती आघाडीतून – संजय शामराव दबडे-ताराराणी आघाडी, अंजली संग्रामसिंह थोरात- ताराराणी आघाडी.
प्रभाग चारमध्ये – यादव आघाडीतून वर्ष सतिश पोवार, अभिजीत निवासराव कदम विरुद्ध मोहनलाल रामलाल माळी-ताराराणी आघाडी पक्ष, सावित्री बाळासाहेब घोटणे- ताराराणी आघाडी, अपक्ष- वैशाली सदाशिव कोपर्डे अशी लढत आहे.
प्रभाग पाच – यादव आघाडीतून विशाल विजय वडगावे, रुपाली अभिजीत माने विरुद्ध युवक क्रांती आघाडीतून अमोल कमलाकर हुकेरी जनसुराज्य शक्ती, सुवर्णा विनायक माने-जनसुराज्य शक्ती.
प्रभाग सहा – यादव आघाडीतून कल्पना सर्जेराव भोसले, अभिजीत बाळासो गायकवाड विरुद्ध युवक क्रांती आघाडीतून ललिता सागर भोसले- जनसुराज्य शक्ती पक्ष, संतोष पंडीत ताईगडे-जनसुराज्य शक्ती पक्ष, अपक्ष- मोहन विलास खटावकर, संतोष बाबुराव तालुगडे, सकल मराठा सेना पक्ष- मंदाकिनी शिवाजी पाटील.
प्रभाग सात – यादव आघाडीतून प्रविण आप्पासो पाटील, सुषमा बाबासो पाटील विरुद्ध युवक क्रांती आघाडीतून अभयसिंह भीमराव यादव-ताराराणी आघाडी पक्ष, पूजा शंकर सूर्यवंशी- ताराराणी आघाडी पक्ष, सकल मराठा सेना पक्ष-माया प्रल्हाद तालुगडे अशी लढत आहे.
प्रभाग आठ – यादव आघाडीतून नीला जयसिंग जाधव, जवाहर बाजीराव सलगर विरुद्ध युवक क्रांती आघाडीतून भारती अंकुश माने- जनसुराज्य शक्ती पक्ष, कमलेश श्यामसुंदर शिरवडेकर-जनसुराज्य शक्ती पक्ष, अपक्ष- ललिता संतोष माळी.
प्रभाग नऊ – यादव आघाडीतून सुमन अशोक कोळी, गुरुप्रसाद दिलीपसिंह यादव विरुद्ध युवक क्रांती आघाडीतून नंदा विठ्ठल हिरवे- ताराराणी आघाडी पक्ष, रंगराव बापुसो पाटील-ताराराणी आघाडी पक्ष.
प्रभाग दहा – यादव आघाडीतून प्रणिता महेश भोपळे, सचिन महादेव चव्हाण विरुद्ध युवक क्रांती आघाडीतून राजश्री बाबासाहेब भोपळे- जनसुराज्य शक्ती पक्ष, अजय श्रीकांत थोरात-जनसुराज्य शक्ती पक्ष अशी दुरंगी लढत आहे.






