
Sanjay raut slams Devendra Fadnavis
नवी दिल्ली : मोदी है तो मुमकिन हैं ही दंतकथा झाली आहे. आता मोदी हैं तो नमकिन हैं अशी परिस्थिती आहे. जे बिल शाह यांनी आणलं ते मोदींना अपमानित करण्यासाठी आणलं होतं का असं वाटतं. महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल आणलं होतं. फक्त जागा वाढवण्याच्या हे यांना करायचं होतं. सत्तेचा अमर पट्टा कायम घ्यायचा हे यांच्या डोक्यात होतं, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
खासदार राऊत यांनी विविध मुद्यांवर भाष्य करत सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘महिला आरक्षणाच्या नावाखाली एक भोंदू बिल आणलं होतं. फक्त जागा वाढवण्याच्या हे यांना करायचं होतं. सत्तेचा अमर पट्टा कायम घ्यायचा हे यांच्या डोक्यात होतं, बेकायदेशीर पद्धतीने भविष्यात विजय मिळवता यावा हाच एकमेव हेतू होता. उत्तर विरुद्ध दक्षिण, पुरुष विरूद्ध महिला हा नॅरेटिव्ह त्यांना सेट करायचा होता. भाजपच्या पुरुष खासदार आणि नेत्यांच्या जागा वाचण्यासाठी या जागा 850 करण्याचा हेतू होता. मात्र, ते उधळून लावलं गेलं. या विधेयकामुळे मोदी विरूद्ध शाह संघर्ष दिसून आला. जी चर्चा दबक्या आवाजात होती ते काल दिसून आली’.
हे देखील वाचा : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार, ८ खासदारांची ठाण्यात गुप्त बैठक? शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ सक्रिय
दरम्यान, शिवसेनेच्या माजी राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत या विधेयकाला पाठिंबा दिल्याचे म्हटले जात होते. त्यावर संजय राऊत म्हणाले, मला माहित नाही. माझ्याकडे अशा गोष्टींची जास्त माहिती नसते.
सोळावं वरीस धोक्याचं असं म्हणतात. भविष्यातील राजकारणात 16 आकडा धोक्याचा आहे. मी माझ्या ट्विटमध्ये त्याची थोडी हिंट दिली आहे. 16 आकड्याचं रहस्य आहे. दरम्यान, कालच्या विधेयकावरून लोकशाही जिवंत आहे हे काल सभागृहात दिसून आलं.