Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात; मतदारांच्या ‘पहिल्या पसंती’वर साऱ्यांच्या नजरा

जिल्ह्यात कुर्डूवाडी (८०), उत्तर सोलापूर (१८८), दक्षिण सोलापूर (८९), पंढरपूर (१००), मंगळवेढा (६२) आणि अकलूज (९७) अशी सहा मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 18, 2026 | 11:12 AM
Solapur News : भाजपच्या प्रतिष्ठेची परीक्षा, पवार गटाच्या अस्तित्वाची लढाई; मतदारांच्या ‘पहिल्या पसंती’वर साऱ्यांच्या नजरा

Solapur News : भाजपच्या प्रतिष्ठेची परीक्षा, पवार गटाच्या अस्तित्वाची लढाई; मतदारांच्या ‘पहिल्या पसंती’वर साऱ्यांच्या नजरा

Follow Us
Follow Us:

पंढरपूर / शिवाजी हळणवर : सोलापूर विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रांवर एकूण ६१५ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून, भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत रंगली आहे.

पंढरपूरसह इतर मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी शांततापूर्ण आणि उत्साही वातावरणात मतदानास सुरुवात केली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आवश्यक त्या सर्व व्यवस्था पूर्ण केल्याची माहिती दिली.

‘लग्न एकासोबत करायचं अन् पळून दुसऱ्यासोबत…’, फोडाफोडीच्या राजकारणावर रोहित पवार कडाडले; थेट सांगितला खासदारांचा ‘रेट’

सोलापूर येथील नियोजन भवनातून केंद्राध्यक्ष, अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक साहित्य घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना झाले. जिल्ह्यात कुर्डूवाडी (८०), उत्तर सोलापूर (१८८), दक्षिण सोलापूर (८९), पंढरपूर (१००), मंगळवेढा (६२) आणि अकलूज (९७) अशी सहा मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रावर तहसीलदार केंद्राध्यक्ष म्हणून कार्यरत असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या निवडणुकीत एक मतदार मयत झाल्याने एकूण मतदारसंख्या ६१५ इतकी राहिली आहे. मतदारांची ओळख पटविण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दिव्यांग तसेच प्रतिबंधात्मक नजरकैदेत असलेले मतदार नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ अशी आहे.

द्विपक्षीय झाली निवडणूक

जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद, एक महानगरपालिका आणि १७ नगरपरिषद व नगरपंचायतींमधील सदस्य, नामनिर्देशित सदस्य व अध्यक्ष मिळून एकूण ६१६ मतदार होते. त्यापैकी एका मतदाराचे निधन झाल्याने ६१५ मतदार मतदान करत आहेत. या निवडणुकीसाठी सुरुवातीला १५ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. मात्र, अंतिम टप्प्यात दोनच उमेदवार मैदानात राहिल्याने निवडणूक थेट द्विपक्षीय झाली आहे.

जांभळा स्केचपेन वापरणे बंधनकारक

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाने पुरविलेला जांभळा स्केचपेन वापरणे बंधनकारक असून उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम अंकात लिहिणे आवश्यक आहे. पहिली पसंती दर्शविण्यासाठी ‘१’ हा अंक लिहिणे अनिवार्य आहे. चुकीच्या पद्धतीने मतदान केल्यास मतपत्रिका अवैध ठरणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

निकालाकडे लागले संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष

संख्याबळाच्या गणितानुसार भाजप व महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचे पारडे जड मानले जात असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ‘अदृश्य हात मदत करेल’ असा दावा करत निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. दोन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून, मतदारांचा ‘पहिला पसंतीक्रम’ अखेर कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत असताना भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयाची खात्री दिली.

Web Title: A test of the bjps prestige a battle for the pawar factions survival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • Maharashtra Legislative Council Election
  • political news
  • Solapur Politics

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.