Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधान परिषद निवडणुकीत अभयसिंह जगताप यांना राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी

किशोर धुमाळ यांच्या अर्जावरील काही प्रस्तावकांच्या सह्यांबाबत हरकत घेण्यात आली होती. यासंदर्भात सुनावणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी संबंधित हरकती फेटाळून अर्ज वैध ठरवला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 03, 2026 | 02:56 PM
विधान परिषद निवडणुकीत अभयसिंह जगताप यांना राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी

विधान परिषद निवडणुकीत अभयसिंह जगताप यांना राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी

Follow Us
Follow Us:

सातारा : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) यांच्याकडून अभयसिंह खाशेराव जगताप यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म सादर झाल्याने त्यांची उमेदवारी वैध ठरली असून उमेदवारीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दुसरीकडे बाळासाहेब ऊर्फ प्रताप पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार आहेत.

मंगळवारी पार पडलेल्या अर्ज छाननी प्रक्रियेत एकूण आठ उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सात उमेदवारांचे एकूण अकरा अर्ज वैध ठरविण्यात आले. अपक्ष उमेदवार सीमा सुनील पोतदार यांनी सादर केलेल्या दोन्ही अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रे व शपथपत्र अपूर्ण असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले.

छाननीनंतर निवडणुकीच्या मैदानात राहिलेल्या उमेदवारांमध्ये महायुतीचे धैर्यशील ज्ञानदेव कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप, तसेच अपक्ष उमेदवार प्रताप धोंडिराम पाटील, मयूर बाबासाहेब पाटील, संजय नायकू मेढे, तानाजी भगवान पाटील आणि किशोर हणमंत धुमाळ यांचा समावेश आहे.

किशोर धुमाळ यांच्या अर्जावरील काही प्रस्तावकांच्या सह्यांबाबत हरकत घेण्यात आली होती. यासंदर्भात सुनावणी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी संबंधित हरकती फेटाळून अर्ज वैध ठरवला. या मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील ४२३ आणि सांगली जिल्ह्यातील ४७२ असे एकूण ८९५ स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी मतदान करणार आहेत.

मोठी बातमी ! पक्षाचा आदेश मानून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या सिद्धरामय्या यांना मिळाली ‘ही’ मोठी जबाबदारी

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ जूनपर्यंत असून त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल. सध्या तरी महायुतीचे धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादीचे अभयसिंह जगताप यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुतीच्या १७ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर

महायुतीमधील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर, १७ अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर, आघाडीने एक मोठा निर्णय घेतला आहे. महायुतीने आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केली असून, बंडखोरांना आपली उमेदवारी मागे घेण्याचे आवाहनही केले आहे.

Web Title: Abhaysingh jagtap receives official ncp candidacy for legislative council election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Maharashtra Legislative Council Election
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
1

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
3

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग
4

Maharashtra Breaking News Today 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.