Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘गणपतीत दंगली घडवण्याचा ‘प्लॅन’? राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेही आक्रमक; म्हणाले, ‘कुठेतरी षडयंत्र दिसतंय!’

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी दंगलीबाबत केलेल्या वक्तव्याची राजकीय चर्चा सुरू आहे. आता आदित्य ठाकरेंनीही राज ठाकरेंच्या भूमिकेला समर्थन देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

  • By विवेक
Updated On: Sep 06, 2026 | 09:33 PM
गणपतीत दंगली घडवण्याचा ‘प्लॅन’? राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेही आक्रमक; म्हणाले, ‘कुठेतरी षडयंत्र दिसतंय!’

गणपतीत दंगली घडवण्याचा ‘प्लॅन’? राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेही आक्रमक; म्हणाले, ‘कुठेतरी षडयंत्र दिसतंय!’

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सव काळात दंगली घडवल्या जाऊ शकतात, राज ठाकरेंचा इशारा
  • आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंच्या भूमिकेशी सहमती
  • मुलुंडमध्ये आदित्य ठाकरेंनी भाजपवर साधला निशाणा
 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दंगलीबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. गणेशोत्सवाच्या दिवसांत महाराष्ट्रासह देशातील काही भागांत दंगली घडवून लोकांचं लक्ष इतर महत्त्वाच्या प्रश्नांपासून विचलित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती राज ठाकरेंनी व्यक्त केली होती. आता त्यांचे पुतणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही या भूमिकेला दुजोरा दिला आहे.

मुंबईतील मुलुंड पूर्व येथे भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून स्वाक्षरी अभियान सुरू करण्यात आलं. या अभियानात सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर भाष्य केलं.

‘कुठेतरी षडयंत्र दिसत आहे’

आदित्य ठाकरे म्हणाले की, लालबाग परिसरात रात्री गेल्यानंतर स्थानिकांकडून काही माहिती मिळाली. त्यातून कुठेतरी षडयंत्र असल्याचं जाणवत असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुण पिढी जात, धर्म आणि प्रांताच्या पलीकडे एकत्र येत असल्याचा दावा करत त्यांनी भाजपवरही टीका केली.

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!

राज ठाकरेंनी व्यक्त केलेल्या दंगलीच्या शक्यतेशी आदित्य ठाकरे यांनी एकप्रकारे सहमती दर्शवली. धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोप त्यांनी केला. मात्र, या आरोपांना त्यांनी ठोस पुरावे दिल्याचं या वक्तव्यामधून दिसून येत नाही.

मिहीर कोटेचांविरोधात स्वाक्षरी अभियान

दरम्यान, मुलुंडमध्ये भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाने स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. मोकळ्या जागा आणि सरकारी भूखंडांच्या वापराबाबत कोटेचा यांच्यावर आदित्य ठाकरेंनी आरोप केले.

मिहीर कोटेचा यांच्या मतदारसंघातील मैदानं, पेट्रोल पंप आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सशी संबंधित जागांवरून आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले. या मुद्द्यावर त्यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत कोटेचा यांच्या जुन्या वक्तव्यांचे व्हिडिओ दाखवले आणि ते खोटे बोलत असल्याचा आरोप केला.

राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे पदाधिकारी मेळाव्यात राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या काळात दंगली घडण्याची भीती व्यक्त केली होती. काही समाजकंटक दोन्ही समाजांच्या नावाने लोकांना भडकवू शकतात आणि त्यातून तरुणांचा बळी जाऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.

Gunratna Sadawarte : ‘आधी शिवसेना भवनातील बाळासाहेबांचा फोटो काढा, नाहीतर..,’; सदावर्तेंचा थेट इशारा, 15 दिवसांची डेडलाइन

हिंदू आणि मुस्लिम समाजातील सुजाण नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं. दंगली आणि धार्मिक वादात लोकांना गुंतवून देशातील मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

राज ठाकरेंच्या या वक्तव्याला आदित्य ठाकरेंकडून मिळालेला दुजोरा पाहता आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी तापण्याची शक्यता आहे.

Web Title: Aditya thackeray support raj thackeray riots statement ganeshotsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • aaditya thackeray
  • raj thackeray
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Gunratna Sadawarte : ‘आधी शिवसेना भवनातील बाळासाहेबांचा फोटो काढा, नाहीतर..,’; सदावर्तेंचा थेट इशारा, 15 दिवसांची डेडलाइन
1

Gunratna Sadawarte : ‘आधी शिवसेना भवनातील बाळासाहेबांचा फोटो काढा, नाहीतर..,’; सदावर्तेंचा थेट इशारा, 15 दिवसांची डेडलाइन

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला
2

DJ Ban Controversy : ‘राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का?’; DJ बंदीवरून गुणरत्न सदावर्तेंचा घणाघाती हल्ला

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार
3

Raj Thackeray on Modi Photo : ‘मोदींचा फोटो दुसऱ्या भिंतीवरती..,’ राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; आशिष शेलारांचा पलटवार

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!
4

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.