Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray on DJ : ‘डीजे-डॉल्बी ही उत्तरेची संस्कृती, महाराष्ट्रात का आणता?’; राज ठाकरेंचा परखड सवाल, फडणवीसांनाही लगावला टोला!

Raj Thackeray on DJ : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी DJ, डॉल्बी आणि सणांच्या नावाखाली होणाऱ्या काही प्रकारांवरून परखड भूमिका मांडली. महाराष्ट्राने आपली पारंपरिक संस्कृती जपावी, असे सांगतानाच गणेशोत्सवाच्या काळात दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

  • By विवेक
Updated On: Sep 06, 2026 | 03:00 PM
Raj Thackeray

Raj Thackeray

Follow Us
Follow Us:
  • DJ-डॉल्बी ही महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती नाही, असा राज ठाकरेंचा दावा
  • सण पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन, लेझर आणि मोठ्या आवाजावरही आक्षेप
  • गणेशोत्सवात दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा कार्यकर्त्यांना सावधतेचा इशारा
 

Raj Thackeray on DJ : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सण, संस्कृती आणि DJ-डॉल्बीच्या वापरावरून परखड भूमिका मांडली आहे. ठाण्यात आयोजित मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील सण साजरे करण्याच्या पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. DJ आणि डॉल्बी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग नसून उत्तरेकडील संस्कृती महाराष्ट्रात आणली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

‘पारंपरिक पद्धतीने सण साजरा करा’

गणेशोत्सवाचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, गणपती श्रद्धेने घरी आणायचा आणि विसर्जनाच्या वेळी DJ-डॉल्बीच्या तालावर नाचायचे, यात नेमका आनंद काय, असा सवाल त्यांनी केला. आपल्या घरी दीड दिवसांचा गणपती असतो. विसर्जनाच्या वेळी घर रिकामं झाल्यासारखं वाटतं, उत्साह कमी झाल्यासारखं जाणवतं, असेही त्यांनी सांगितले.

गोविंदा उत्सवातील काही कार्यक्रमांमध्ये महिलांना व्यासपीठावर नाचवण्याच्या प्रकारावरही त्यांनी आक्षेप घेतला. ही पद्धत उत्तर भारतात चालते, मग महाराष्ट्राने ती स्वीकारण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सण कसे साजरे करायचे यासाठी एक प्रकारचा प्रोटोकॉल असावा आणि महाराष्ट्राने आपल्या परंपरेनुसार उत्सव साजरे करावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Raj Thackeray on Ganeshotsav 2026: ‘गणेशोत्सवात दंगल घडवणार…’ राज ठाकरेंच्या दाव्याने उंचवलेल्या सर्वांच्या भुवय्या

‘लेझर आणि डॉल्बीचा त्रास’

DJ, डॉल्बी आणि लेझर लाईटच्या अतिवापराबाबतही राज ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. मोठ्या आवाजामुळे हृदयविकाराचा त्रास असलेल्या व्यक्तींना धोका निर्माण होऊ शकतो, तर लेझर लाईटमुळे डोळ्यांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागचा उद्देश काय होता आणि आज उत्सव कुठे पोहोचला आहे, याचा विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रात DJ वाजवण्यावरून सुरू असलेल्या वादावरही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. कायद्याने DJ बंद करता येत नाही, असे मुख्यमंत्री सांगत असतील तर नागपूरमध्ये DJ बंद कसा झाला, असा सवाल त्यांनी केला.

Sanjay Raut Toxic Test News: तुरुंगात असताना विषप्रयोग…? संजय राऊतांचा धक्कादायक गौप्यस्फोट

गणेशोत्सवात दंगलीबाबत सावधतेचा दिला इशारा

राज ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आणखी एका मुद्द्यावर सावध केले. सणांच्या काळात दंगली घडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि त्यामुळे हिंदू-मुस्लिम समाजातील लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबईत अलीकडे काही घटना घडल्याचा उल्लेख करत त्यांनी सुजाण हिंदू आणि सुजाण मुस्लिमांनी अफवा किंवा कोणत्याही चिथावणीला बळी पडू नये, असे आवाहन केले. उत्सव साजरा करणे योग्य आहे; मात्र धर्मांधता समाजाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते, असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

Web Title: Raj thackeray on dj ganeshotsav maharashtra culture riots warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Dahi Handi 2026
  • Ganeshotsav 2026
  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: १० थरांची हॅट्रिक करणारा जय जवान यंदा ९ थरांवरच अडकला! मैदानात नेमकं काय घडलं?
1

Jai Jawan Govinda Pathak Dahi Handi 2026: १० थरांची हॅट्रिक करणारा जय जवान यंदा ९ थरांवरच अडकला! मैदानात नेमकं काय घडलं?

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट; १६८ गोविंदा जखमी, थरावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू, तर खांब कोसळून चिमुकल्याचा अंत
2

दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट; १६८ गोविंदा जखमी, थरावरून पडून एका गोविंदाचा मृत्यू, तर खांब कोसळून चिमुकल्याचा अंत

गणपती बाप्पाच्या आगमनाआधी महामेट्रोचे मोठे गिफ्ट; Pune Metro ने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
3

गणपती बाप्पाच्या आगमनाआधी महामेट्रोचे मोठे गिफ्ट; Pune Metro ने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…
4

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.