Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manikrao Kokate Resignation: ‘दादां’नी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला; पक्ष संदर्भात अजित पवारांचा महत्वाचा निर्णय

Manikrao Kokate: २७ वर्षांपूर्वीच्या नाशिक फ्लॅट घोटाळ्यात दोषी ठरल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला. अजित पवारांनी राजीनामा स्वीकारला असून कोकाटेंवर अटकेची तलवार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 18, 2025 | 06:18 PM
'दादां'नी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला (Photo Credit - X)

'दादां'नी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा!
  • २७ वर्षांनंतर कोर्टाचा दणका
  • अजित पवारांकडून राजीनामा स्वीकारला
Manirao Kokate Resignation Accepted by Ajit Pawar: नाशिकमधील ‘मुख्यमंत्री आवास योजने’त झालेल्या फसवणूक प्रकरणात दोषी ठरल्यानंतर राज्याचे क्रीडा मंत्री आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोशल मीडियाद्वारे या राजीनाम्याची माहिती दिली. आता मुख्यमंत्री स्तरावर हा राजीनामा स्वीकारल्यानंतर कोकाटे यांचे मंत्रिपद अधिकृतपणे रद्द होईल.

कायद्याचे राज्य आणि पक्ष भूमिका

अजित पवार म्हणाले, आमच्या पक्षाची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिली आहे, ‘कायदा आणि नियम हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहेत.’ न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. याच दीर्घकालीन भूमिकेला अनुसरून, माननीय न्यायालयाच्या निकालानंतर श्री. कोकाटे यांनी दिलेल्या राजीनाम्यावर तातडीने निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील संवैधानिक कार्यवाही

संवैधानिक प्रक्रियेचे पालन करत, श्री. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सार्वजनिक जीवनात काम करताना संस्थात्मक प्रामाणिकता आणि संविधानाचे पालन करणे हे आमचे सर्वोच्च कर्तव्य आहे. न्यायव्यवस्थेने दिलेल्या निकालाचा आम्ही आदर करतो आणि कायदेशीर प्रक्रियेवर आमचा ठाम विश्वास आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकशाही मूल्यांची जपणूक करून जनतेचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू.

माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत, या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन… pic.twitter.com/vmba0u3ao4 — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 18, 2025

हे देखील वाचा: देवेंद्र फडणवीस सर्वांचा टप्पाटप्प्याने कार्यक्रम करणार…! खासदार संजय राऊतांचा इशारा

माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार

राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता असताना त्यांची तब्येत बिघडली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर हायकोर्ट काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

नेमके काय आहे फसवणूक प्रकरण?

हे प्रकरण मुख्यमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिका (फ्लॅट) वाटपात झालेल्या कथित फसवणुकीशी जोडलेले आहे. नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या एका अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यांतर्गत १० टक्के सदनिका आरक्षित असतात. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी कागदपत्रांमध्ये फसवणूक करून या योजनेतून चार सदनिका हडपल्याचा त्यांच्यावर आरोप होता. याच प्रकरणात जिल्हा न्यायालयाने दोघांना दोषी ठरवले आहे. जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी.एम. बदर यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रुपाली नरवाडिया यांच्या न्यायालयाने पूर्वी दिलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आणि शिक्षा तात्काळ अंमलात आणण्याचे आदेश दिले.

२७ वर्षांपूर्वी सुरू झाला होता खटला

माणिकराव कोकाटे (वय ६७) हे सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी १९९९, २००४ आणि २००९ मध्ये विजय मिळवला होता. २०२४ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. या प्रकरणाची सुरुवात १९९७ मध्ये झाली होती. तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी मुख्यमंत्री कोट्याच्या सदनिकांमध्ये कथित फसवणूक झाल्याबद्दल याचिका दाखल केली होती. हा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. सुमारे २७ वर्षांनंतर आता या खटल्यात न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

हे देखील वाचा: Manikrao Kokate : कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? आमदारकी रद्द करण्यासाठी रोहित पवार उतरले मैदानात

Web Title: Ajit pawar accepted manikrao kokates resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 06:18 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Politcs
  • Manikrao Kokate

संबंधित बातम्या

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार; काँग्रेसही उमेदवार देणार?
1

Baramati By Election : बारामती पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार; काँग्रेसही उमेदवार देणार?

Baramati By Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही; ‘या’ नेत्याने केला तीव्र विरोध
2

Baramati By Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही; ‘या’ नेत्याने केला तीव्र विरोध

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यावर प्रश्नचिन्ह; भाजपमध्येच पवारविरोधी गट ‘अ‍ॅक्टिव्ह’
3

बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यावर प्रश्नचिन्ह; भाजपमध्येच पवारविरोधी गट ‘अ‍ॅक्टिव्ह’

Baramati by-election : “वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर…; बारामती पोटनिवडणूकीवर रोहित पवारांची भावनिक पोस्ट
4

Baramati by-election : “वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर…; बारामती पोटनिवडणूकीवर रोहित पवारांची भावनिक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.