Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात महायुती नाहीच? फडणवीसांची घोषणा; मात्र अजित पवारांच्या उत्तराने वाढवली उत्सुकता

पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने असतील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यावर पालकमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 16, 2025 | 11:29 AM
Ajit Pawar on NCP vs BJP in Pune and PCMC municipal elections 2025 political news

Ajit Pawar on NCP vs BJP in Pune and PCMC municipal elections 2025 political news

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यामध्ये महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली
  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यामध्ये युती नसल्याचे जाहीर केले
  • मात्र यावर अजित पवारांनी माहिती नाही असे उत्तर दिले
Ajit Pawar News : पुणे : राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीची (Maharashtra Local Body Elections)  घोषणा करण्यात आली आहे. यानंतर राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला. सर्वच पक्षांनी बैठकी घेतल्या असून युतीच्या चर्चांनी जोर धरला. निवडणूक जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnvais) यांनी पुण्यामध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे स्पष्ट केले. जाहीर होताच त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मात्र यावर पुण्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील माध्यमांनी प्रश्न केला.

राज्य निवडणूक आयोग निवडणूक जाहीर केली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर होते. निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीची घोषणा होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचे भाष्य केले. फडणवीस म्हणाले की, “काही ठिकाणी भाजप-राष्ट्रवादी अशी युती होईल. पुण्यात मात्र माझी आणि अजित पवार यांची चर्चा झाली आहे. आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत. भाजपने 5 वर्षात चांगल्या पद्धतीने पुण्याचा विकास केलेला आहे. कदाचित पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप आमने-सामने लढताना दिसतील. ही लढत मैत्रीपूर्ण असणार आहे. कुठेही कटुता नसेल.”अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. यामुळे पुण्यामध्ये महायुतीचा काडीमोड झाला असल्याचे दिसून आले.

हे देखील वाचा : नागपूरची थंडी नेत्यांना होईना सहन! हिवाळी अधिवेशनामध्ये दोन मंत्री,10 आमदार अन् 1355 कर्मचारी पडले आजारी

फडणवीस पुढे म्हणाले की, शिवसेना शक्यतो सर्वच ठिकाणी आमच्यासोबत असेल. मात्र पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही आणि अजित पवार एकत्र लढू शकणार नाही. आम्हालाही एवढं राजकारण समजतं. आम्ही दोघं एकत्र लढलो तर तिसऱ्याचा फायदा होईल. त्यामुळे आम्ही तिसऱ्यासाठी जागा बाकी ठेवणार नाही. आम्हीच एकमेकांसमोर लढू आणि ही मैत्रिपूर्ण लढत असेल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

हे देखील वाचा : उमेदवारांनो लक्ष द्या ! उमेदवारी अर्जाबाबत महत्त्वाची माहिती आली समोर; आता अर्ज भरताना…

पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये महायुती एकत्र नसल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली. याबाबत पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील प्रश्न विचारण्यात आला. याबाबत अजित पवार म्हणाले की, आमची रणनीती ही निवडणूका लढवण्याचीच असणार आहे. आम्ही अनेक विषयांवर चर्चा करतो. पण तुम्हाला काय सांगितलं जातं हे मला माहिती नाही. पण त्यांनी सांगितलं तर विचार करुन सांगितलं असेल अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.

Web Title: Ajit pawar on ncp vs bjp in pune and pcmc municipal elections 2025 political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 11:29 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Local Body Election
  • Pune Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये तिरंगी लढत; भाजप-राष्ट्रवादी अन्…; कोण जिंकणार?
1

Maharashtra Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये तिरंगी लढत; भाजप-राष्ट्रवादी अन्…; कोण जिंकणार?

Maharashtra Politics: भाजप- राष्ट्रवादीशी काडीमोड घेणार? महापालिका निवडणूक लागताच फडणवीस म्हणाले, कदाचित…
2

Maharashtra Politics: भाजप- राष्ट्रवादीशी काडीमोड घेणार? महापालिका निवडणूक लागताच फडणवीस म्हणाले, कदाचित…

महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार; भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनाला मोठं यश
3

महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार; भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनाला मोठं यश

बारामतीत प्रचाराची रणधुमाळी पुन्हा सुरू; नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार जोमाने उतरले मैदानात
4

बारामतीत प्रचाराची रणधुमाळी पुन्हा सुरू; नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवार जोमाने उतरले मैदानात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.