
Ambadas Danve protest on Samruddhi Highway over Onion issue, Shivsena UBT Protest on samruddhi highway, Onion Issue in Maharashtra,
राज्यात कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. आखाती देशांतील युद्ध आणि निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कांद्याचा खर्चहि निघत नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. यावरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकून आंदोलन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो दराने कांदा विकत घ्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली. परंतु सरकारचे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे आरोप दानवे यांनी यावेळी केले.
वाहतूक व्यवस्था कोलमडण्याच्या कारणावरून पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र तरीही अंबादास दानवे हे शेतकरी, पदाधिकारी आणि इतर शिवसैनिक यांच्यासह समृद्धी महामार्गावर दाखल झाले.
यावेळी माध्यमांशी बोलताना आमदास दानवे म्हणाले, “आम्हाला पोलिसांच्या परवानगीची आम्हाला गरज नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत. सरकार १२ रुपये ३५ पैसे अनुदान देत असल्याचे सांगितले जात असले तरी ते खरे नाही. सरकारचे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी समृद्धी महामार्ग ठप्प! ✊🔥 इतिहासात पहिल्यांदाच समृद्धी महामार्गावर शिवसैनिकांचा बुलंद आवाज घुमला! जांबरगाव इंटरचेंज येथे ऐतिहासिक चक्काजाम करून समृद्धी महामार्ग रोखला! कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी या कोडग्या सरकारला दाखवून दिल्याशिवाय… pic.twitter.com/m6bZMrRdyF — Ambadas Danve (@iambadasdanve) May 18, 2026
दरम्यान महामार्गावर वाहतूककोंडी वाढल्याने पोलिसांकडून अंबादास दानवेंना ताब्यात घेण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करत दानवेंना वाहनात बसवले. शिवसैनिकांकडून पोलिसांचे वाहनही अडवण्याचे प्रयत्न करण्यात आले. वाहनावर थापा मारून त्यांनी यावेळी निषेध व्यक्त केला. यावेळी काह शिवसैनिकानाही ताब्यात घेण्यात आले. आंदोलनाच्या पार्शवभूमीवर पोलिसांकफून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सुमारे अर्ध्या तासानंतर वाहतूक व्यवस्था पुर्वव्रत करण्यात आली.