Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट, तातडीने दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या- हर्षवर्धन सपकाळ

Harshvardhan Sapkal on Maharashtra farmer crisis: महाराष्ट्रातील पावसाअभावी शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर झाली असून, सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 10, 2026 | 08:58 PM
Harshvardhan Sapkal on Maharashtra farmer crisis

Harshvardhan Sapkal on Maharashtra farmer crisis

Follow Us
Follow Us:
  • पावसाने शेतकरी बेहाल
  • सरकारवर सपकाळांचा हल्लाबोल
  • दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
मुंबई:राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे पण सरकारचे मात्र त्यांच्याकडे लक्ष नाही. कुंभमेळ्यातील CCTV वर ३०० कोटी खर्च करणारे महायुती सरकार शेतकऱ्यांना काहीही मदत करत नाही. शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला जात असताना मंत्रिमंडळ बैठकीत यावर काहीही चर्चा झाली नाही. शेतकऱ्यांची अवस्था पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

FDA News: घाणेरडी फरशी, झुरळे-उंदीर अन् वापरलेले तेल! फरसाण-वेफर्स बनवणाऱ्या 11 आस्थापनांवर FDAची धडक कारवाई

नवी दिल्लीतील नविन महाराष्ट्र सदन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, महाराष्ट्रात सर्वात मोठा हंगाम खरिपाचा आहे, पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. पेरण्या उशिरा झाल्या आणि आता १ महिन्यापासून पाऊस नाही. जे पेरले ते उगवले नाही व जे उगवले ते करपून गेले आहे. पावसाने दडी मारल्यानंतर कृत्रिम पाऊस पडण्याबाबत सरकारने पाऊल उचलायला पाहिजे होते पण सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. वीज गायब होत असल्याने ज्या ठिकाणी पाणी आहे तेथिल शेतकऱ्यांना पिकाला पाणीही देता येत नाही. सरकारने आतापासूनच टंचाईच्या अनुषंगाने नियोजन करावे. जनावरांना मिळणाऱ्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. एकही बळी जाऊ नये यासाठी सरकारने काळजी घेतली पाहिजे. केंद्र सरकारच्या निकषाने शेतकऱ्यांना पैसे द्यावेत, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

MPSC चा कारभार काही सुधारत नाही

राज्यातील लाखो विद्यार्थी सरकारी नोकरी मिळावी, अधिकारी व्हावे अशी स्वप्ने उराशी पुण्यात लाखो विद्यार्थी एमपीएससीची तयारी करत आहेत, यात ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे पण MPSC च्या भोंगळ कारभाराने या विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले आहे. पेपरफुटी व अनागोंदी कारभाराने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे, अनेकदा रस्त्यावर उतरून जाब विचारला तरीही MPSC चा कारभार काही सुधारत नाही. एमपीएससी चे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे. मागच्या काळातील भ्रष्टाचारातील व्यक्तींना वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपला मित्र एमपीएससीच्या अध्यक्षपदावर बसवला आहे. औषध निरीक्षक परीक्षेचा घोळ ताजा असतानाच आता गट- क चा पेपर आधीच फुटल्याचे समोर आले आहे, म्हणून ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पेपरफुटीचा गुन्हा हा संघटित आहे, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.

खा.पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा

पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजे. हे प्रकरण मुख्यमंत्री यांनीच बाहेर आणलं होतं आता न्यायलयाने विचारणा केली, त्याचे उत्तरही फडणवीस यांनी द्यावे. या जमीन घोटाळ्यातील मूख्य सूत्रधार खासदार पार्थ पवार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी

Web Title: Maharashtra farmer crisis drought 50 thousand hectare harshvardhan sapkal mpsc parth pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • Congress
  • drought news
  • Harshwardhan Sapkal

संबंधित बातम्या

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन
1

Buldhana News: पीकविम्याची नुकसान भरपाई मिळावी, तालुकात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांचे तहसीलपुढे आक्रोश आंदोलन

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी
2

Youth Congress Protest: नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक; मनुस्मृतीविरोधात ‘सन्मान मोर्चा’, MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचीही मागणी

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी
3

जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा, जनगणनेत OBC प्रवर्गाचा…; काँग्रेसच्या नेत्याची मागणी

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी
4

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.