
फोटो सौजन्य सोशल मिडिया
उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये आवळ्याची पारंपरिक लागवड आणि त्यावर होणारी प्रक्रिया आता शेतकरी तसेच महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत असल्याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. आवळा “चविष्टही आणि आरोग्यदायीही” असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे आवळ्याचा संबंध रोगप्रतिकारक शक्ती, प्रतिबंधात्मक आरोग्य आणि संतुलित आहाराशी पुन्हा चर्चेत होत आहे
आपल्या पूर्वजांनी पिढ्यान्पिढ्या आवळ्याच्या फायद्यांविषयी सांगितले आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये आवळ्याची पारंपरिक लागवड आणि त्यावर होणारी प्रक्रिया आता शेतकरी तसेच महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करत असल्याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. आवळा “चविष्टही आणि आरोग्यदायीही” असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे आवळ्याचा संबंध रोगप्रतिकारक शक्ती, प्रतिबंधात्मक आरोग्य आणि संतुलित आहाराशी पुन्हा चर्चेत आला आहे.
‘केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून…’; महारोजगार मेळाव्यात काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
आवळा हा इंडियन गूजबेरी, हा भारतीय आहारातील पारंपरिक आणि पोषक फळ आहे. यात व्हिटॅमिन सी आणि रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते. या मुळे आवळ्याचे सेवन जास्त प्रमाणात केले जाते.आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी आवळा किती प्रमाणात खावा, याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
आवळा हा नैसर्गिक असल्याने यात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते यासोबतच आवळ्यात विविध वनस्पतीजन्य घटक आणि आहारातील तंतू म्हणजेच फायबर असतात. व्हिटॅमिन सी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देते. यंत्रणेच्या कार्याला मदत करते. तसेच वनस्पतीजन्य पदार्थांमधून मिळणारे लोह शरीरात शोषून घेण्यासही व्हिटॅमिन सी मदत करते.आवळ्यामध्ये असलेले फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स संतुलित आहाराचा भाग म्हणून घेतल्यास एकूण आरोग्यासाठी उपयुक्त आहे.
आवळा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरी तो किती प्रमाणात खावा, हे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते आवळ्याचे अतिसेवन करण्याची गरज नाही. डॉ. सुजित पॉल सांगतात की, सामान्य प्रौढ व्यक्तीसाठी दररोज 30 ते 50 ग्रॅम किंवा 1 ते 2 ताजे आवळे पुरेसे असतात. आहाराच्या विशिष्ट गरजेनुसार तज्ज्ञांचा सल्ला नसेल तर दररोज सुमारे 100 ग्रॅम आवळा खाण्याची बहुतेक लोकांना गरज नसते.