Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics : अमोल मोहिते यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची अखेर

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नूतन नगरसेवकांना फक्त प्रभागाचे न बघता शहराच्या विकासाचे बघा, असा थेट सल्ला दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 27, 2025 | 08:02 AM
अमोल मोहिते यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची अखेर

अमोल मोहिते यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची अखेर

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : तब्बल चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीची अखेर करत नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी सभागृहाच्या शानदार सोहळ्यात नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

सातारा शहराच्या महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांसाठी महत्त्वाचे प्रस्ताव सादर करण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे यांनी करत आगामी निवडणुका या सातारा शहरात महानगरपालिकेसाठी होतील, असे संकेत दिले. तर पुढील पाच महिन्यात सातारा नगरपालिका सदर बाजार कॅम्प येथील पालिकेच्या नवीन इमारतीत स्थलांतरित होईल, अशी घोषणा खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

हेदेखील वाचा : Jayant Patil Meet Uddhav Thackeray: मातोश्रीवर घडामोडींना वेग! मुंबईसाठी जयंत पाटलांचे ठाकरेंना गाऱ्हाणे?

मनोमिलनाच्या दोन्ही शिलेदारांनी सातारा शहराच्या विकासासाठी आम्ही दोघे कोठेही कमी पडणार नाही. सर्व नगरसेवकांनी सातारा शहरातील नागरिकांच्या आशा आकांक्षा समजावून घेत त्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, असा सल्ला नूतन नगरसेवकांना दिला. या कार्यक्रम सोहळ्यामध्ये मुख्याधिकारी विनोद जळक यांनी नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्याकडे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पदभार हस्तांतरित केला. या तांत्रिक प्रक्रियेनंतर खासदार उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे या दोन्ही नेत्यांनी अमोल मोहिते यांना त्यांच्या दालनातील नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत बसवून आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अमोल मोहिते यांनी दोन्ही महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली. सोमवारी पहिल्या प्रशासकीय सर्वसाधारण सभेची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. या सभेमध्ये उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड केली जाईल, असा अंदाज आहे.

तत्पूर्वी झालेल्या पदग्रहण सोहळ्यामध्ये कार्यक्रमाची सुरुवात खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सर्व मतदार बंधू सर्व नगरसेवक व मनोमिलनाचे दोन्ही राजे या सर्वांचे अमूल मोहिते यांनी मनापासून आभार मानले.

आता प्रत्यक्ष कामातूनच बोलेन

सातारा पालिकेचे प्रशासन पारदर्शी निष्पक्ष आणि लोकांच्या हिताला प्राधान्य देणारे राहील सातारकरांच्या हिताचा आणि त्यांच्या अपेक्षांना खरा उतरेल, असा कारभार करून दाखवू फार बोलणार नाही, प्रत्यक्ष कृतीच बोलेल, अशा मोजक्या शब्दांमध्ये अमोल मोहिते व्यक्त झाले.

फक्त प्रभागाचे न बघता शहराच्या विकासाचे बघा

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नूतन नगरसेवकांना फक्त प्रभागाचे न बघता शहराच्या विकासाचे बघा, असा थेट सल्ला दिला. तसेच सातारा शहराच्या पाच वर्षानंतरच्या पुढील निवडणुका या नगरपालिकेच्या नाही तर महानगरपालिकेच्या होतील. त्यासाठी आवश्यक संख्याबळ, पायाभूत सुविधांचा विकास, सातारा शहराची चौफेर रचना या दृष्टीने आपल्याला येत्या पाच वर्षांत काम करावे लागेल. जे प्रकल्प मार्गी लागले त्यांची देखभाल दुरुस्ती आणि आगामी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी तातडीने राज्य शासनाकडे तांत्रिक तपशीलासह प्रस्ताव तातडीने दाखल करा, अशा सूचनाही यावेळी दिल्या.

विकासात आम्ही कुठंही कमी पडणार नाही

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात आल्यानंतर येथे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. 1991 साली याच सभागृहातून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली होती. मी व शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा शहराच्या विकासात आम्ही कोठेही कमी पडणार नाही. केंद्राकडून व राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. भाजप हा राज्यातील तसेच देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. सातारा शहरासाठी आपण जास्तीत जास्त निधीच्या माध्यमातून शहराची चौफेर प्रगती घडू यासाठी आपण विकासाचे प्रकल्प आपल्या विकासाच्या संकल्पना आमच्याकडे थेटपणे मांडाव्यात, असे आवाहन उदयनराजे यांनी केले.

Web Title: Amol mohite has assumed the charge of the mayor of satara municipal council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 08:02 AM

Topics:  

  • political news
  • Satara News

संबंधित बातम्या

नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधूम; नवी पिढी नव्या जल्लोषात तयार
1

नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधूम; नवी पिढी नव्या जल्लोषात तयार

Hingoli Politics : ३० वर्षांनंतर हिंगोली न.प. वर शिवसेनेचा झेंडा; रेखा श्रीराम बांगर यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार
2

Hingoli Politics : ३० वर्षांनंतर हिंगोली न.प. वर शिवसेनेचा झेंडा; रेखा श्रीराम बांगर यांनी स्वीकारला नगराध्यक्षपदाचा पदभार

Nanded Politics : मुख्यमंत्र्यांची सभा, तरीही पराभव! संतोष बांगर यांचे संघटनकौशल्य निर्णायक
3

Nanded Politics : मुख्यमंत्र्यांची सभा, तरीही पराभव! संतोष बांगर यांचे संघटनकौशल्य निर्णायक

BJP Brahmin MLA meeting : जातीवर आधारित राजकीय समीकरणे! भाजपच्या 40 ब्राम्हण आमदारांची चार तास बैठक
4

BJP Brahmin MLA meeting : जातीवर आधारित राजकीय समीकरणे! भाजपच्या 40 ब्राम्हण आमदारांची चार तास बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.