Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये? गणेशोत्सवानंतर आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता

जिल्ह्यात 14 जुलै ते 18 ऑगस्टदरम्यान प्रभागरचना कार्यक्रम राबविण्यात आला. 22 ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली. सध्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवानंतर आरक्षण निश्चित होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 30, 2025 | 10:29 AM
मलकापुरात आणखी एक जागा बिनविरोध; दुसऱ्या जागेसाठी भाजप-राष्ट्रवादीत लढत

मलकापुरात आणखी एक जागा बिनविरोध; दुसऱ्या जागेसाठी भाजप-राष्ट्रवादीत लढत

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती : बहुप्रतीक्षित जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेला अखेर न्यायालयाच्या आदेशावरून गती मिळाली आहे. 2017 मध्ये निश्चित करण्यात आलेल्या प्रभाग रचनेनुसारच यंदाच्या निवडणूक घेण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे 59 गट आणि पंचायत समितीचे 118 गण कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले. पुनर्रचनेचा कार्यक्रम देखील पार पडला आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवानंतर लगेच आरक्षण, मतदारयादी आणि ऑक्टोबरमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन नोव्हेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात 14 जुलै ते 18 ऑगस्टदरम्यान प्रभागरचना कार्यक्रम राबविण्यात आला. 22 ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली. सध्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. या उत्सवानंतर आरक्षण निश्चित होणार आहे. आरक्षण आणि मतदार यादीचा कार्यक्रम किमान एक महिना चालल्यास ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम आणि नोव्हेंबरमध्ये मतदान प्रक्रिया आटोपण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा : “आरक्षणाची न्यायालयीन लढाई हरणाऱ्यांना मराठ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही”, एकनाथ शिंदेंची उबाठावर घणाघाती टीका

अमरावती जिल्हा परिषदेसह 14 पंचायत समित्यांमध्ये सध्या प्रशासक आहे. साडेतीन वर्षांपासून राजकीय पदाधिकारी निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मार्च महिन्यात न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश दिले.

प्रभाग रचनेत सदस्य संख्या ५९ वरून ६६

2022 मध्ये जिल्हा परिषदेने केलेल्या प्रभाग रचनेत सदस्य संख्या ५९ वरून ६६ तर पंचायत समित्यांच्या गणाची संख्या ११८ वरून १३२ केली होती. त्यामुळे नेमके कोणत्या संख्येनुसार निवडणुका होणार हा संभ्रम होता. आता शासनाच्या आदेशाने चित्र स्पष्ट झाले आहे. शासनाने २०१७ मधील प्रभागरचना कायम ठेवत निवडणूक कार्यक्रमास मंजुरी दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून अनेक निवडणुका प्रलंबित

राज्यातील अनेक महानगरपालिका, नगरपालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. या निवडणुका तीन टप्प्यांमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकींमधील प्रभाग रचना आणि इतर कामांसाठी 2011 ची लोकसंख्याच ग्राह्य धरली जाणार आहे.

Web Title: Amravati zilla parishad and panchayat samiti elections may in november

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 10:29 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

मोदी सरकारला गांधी नावाची एलर्जी; MGNREGAच्या नामांतरात आता बापू म्हणून उल्लेख
1

मोदी सरकारला गांधी नावाची एलर्जी; MGNREGAच्या नामांतरात आता बापू म्हणून उल्लेख

Maharashtra Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये तिरंगी लढत; भाजप-राष्ट्रवादी अन्…; कोण जिंकणार?
2

Maharashtra Politics: पिंपरी-चिंचवडमध्ये तिरंगी लढत; भाजप-राष्ट्रवादी अन्…; कोण जिंकणार?

“पुण्याच्या विकासाचा नवा…”; निवडणुकीआधी Devendra Fadnavis यांनी दिली ३ हजार कोटींची भेट
3

“पुण्याच्या विकासाचा नवा…”; निवडणुकीआधी Devendra Fadnavis यांनी दिली ३ हजार कोटींची भेट

Ahilyanagar : अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा ब्राँझ पुतळा साकारला
4

Ahilyanagar : अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा ब्राँझ पुतळा साकारला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.