anil dekhmukh target devendra fadnavis
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे राज्याचे राजकारण रंगले आहे. नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याने गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेमुळे मला कधीही अटक होऊ शकते असा मोठा दावा शरद पवार गटाचे नेते व आमदार अनिल देशमुख यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना एकच उधाण आले आहे. अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असे वक्तव्य केले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ दिवसेंदिवस वाढ होत आहे. राजकीय नेत्यांची अडवणूक केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली होती. भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस अधिक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आला आहे. यावरुनच सीबीआयकडून देशमुख यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट करुन अनिल देशमुख यांनी त्यांच्या मनातील भीती व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
काय लिहिले आहे ?
अनिल देशमुख यांनी त्यांच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे. 4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 4 वर्षा पुर्वीची घटना उकरुण काढीत माझ्या विरुध्द दिल्लीच्या मदतीने CBI FIR दाखल केली आहे.
4 वर्षापुर्वी मी गृहमंत्री असतांना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीष महाराज यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलीस अधिकाऱ्यावर दबाव टाकला होता, हा…— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) September 10, 2024
पुढे त्यांनी लिहिले आहे की, माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकुन मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ED-CBI ला हाताशी धरुण महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगु ईच्छीतो की, देवेंद्र फडणवीस मी माझ्या अटकेची वाट पाहत आहे, असे विधान अनिल देशमुख यांनी केले आहे.