Maharashtra Politics : 'महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास, त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?'; अंजली दमानिया यांचा हल्लाबोल
पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात काही मुद्यांवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. असे असताना आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. ‘महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास आहेत. त्यांना अर्थकारण खरंच कळतं का?’, असे म्हणत दमानिया यांनी टीकास्त्र सोडले.
अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, माहितीचा अधिकार हा कायदा १२ ऑक्टोबर रोजी आपल्या देशात लागू करण्यात आला. माहितीचा अधिकार कायद्याला फारसे कोणी महत्व देत नाही. खरी लोकशाही हवी असेल, तर माहितीचा अधिकार सगळ्यांना असावा. हा कायदा पूर्ववत करण्यात आला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरणावर त्यांनी म्हटले की, सगळ्या गुंडांसोबत सगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो कसे? राजकारणात सगळ्यांना गुंड लागतात. राजकारणाचे चित्र बदलाची गरज आहे. त्यांना भीती निर्माण करून राज्य करायचं आहे. पुणे पोलिस आयुक्त यांनी शस्त्र परवाना रद्द केला असताना सुद्धा गृहराज्यमंत्री आदेश देतात, हे रोजचे तमाशे आहेत’, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
गुंड निलेश घायवळ याने भारताबाहेर जाऊन पलायन केले. यावर दमानिया म्हणाले, ‘राजकारणात काय चाललं आहे हे कळतं नाही. मुख्यमंत्री म्हणतात पासपोर्ट आम्ही दिला नाही. गलिच्छ पद्धतीने सगळ्या गोष्टी होत आहेत. बीड, धाराशिवमधून आम्हाला जे पोहचतावा आलं, तेव्हा आम्ही दिलं आहे. राजकारणी यांच्याकडे राजकारण आणि नेते फोडण्यासाठी पैसे आहेत. मुख्यमंत्री हे घायवळचे नाव घेतात. आत्ताच्या घडीला तो फरार आहे, हे फार वेदनादायी आहे. मुख्यमंत्री अशा लोकांना पाठिंबा देत असतील, तर हे चुकीचं आहे.
हेदेखील वाचा : Anjali Damania On Nitin Gadkari Fraud : अंजली दमानियांचा नितीन गडकरींवर पहिलाच मोठा आरोप; प्रत्येक किलोमीटर मागे पैसे खात..”