
Anjali Damania Press Conference on Pune Land Scam Parth Pawar Action
अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील या जमीन प्रकरणावरुन पार्थ पवार यांना वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. अंजली दमानिया म्हणाल्या की, शीतल तेजवानीला यापूर्वी रॉयल ट्रीटमेंट मिळाली होती. मात्र, त्यांना जी ट्रीटमेंट मिळाली ती बघून बरं वाटलं. पुण्यातील जमीन प्रकरणातील कारवाई संपूर्ण फार्स असून त्याची सुरुवात पाच नोव्हेंबरपासून झाली. इतका संघर्ष करूनही या प्रकरणांमध्ये काहीच होत नाही. अजित पवारांच्या मुलाला कायदा लागू होत नाही, राजकारणी असाल तर तुम्हाला काहीच होत नसल्याचे त्या म्हणाल्या. अधिवेशनामध्ये गदारोळ होऊ शकतो म्हणूनच काहीतरी दाखवायचं म्हणून शीतल तेजवानीला अटक करण्यात आली, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.
हे देखील वाचा : निष्काळजीपणाचा कळस! कळवा रुग्णालयात ऑक्सिजन वाहिनी बसवण्यास टाळाटाळ
पुढे त्यांनी दिग्विजय पाटील याच्या चौकशीवरुन पोलिसांवर जोरदार हल्ला केला. अंजली दमानिया म्हणाल्या की, या प्रकरणातील आरोपी दिग्विजय पाटील यांची चौकशी होऊन तो बहरीनला गेला आहे. दिग्विजय पाटील अजित पवार यांच्या चिरंजीवांच्या लग्नासाठी जाणार आहे. इतके गुन्हे दाखल असताना ते त्याला बहरिनला कसे पाठवण्यात आलं? ही व्यक्ती परत आली नाहीतर चौकशी कशी होणार? असा सवाल उपस्थित करत दमानिया यांनी संताप व्यक्त केला.
हे देखील वाचा : अनर्थ! चिमुरड्यांनी प्यायले गुडनाईट लिक्विड अन्…; दापोलीत नेमके घडले तरी काय?
अंजली दमानिया यांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर टीकास्त्र डागले. त्या म्हणाल्या की, त्या म्हणाल्या, अजित पवारांच्या मुलाला कायदा लागू होत नाही, राजकारणी असाल तर तुम्हाला काहीच होत नाही. दिग्विजय पाटलांची चौकशी दोन तारखेला झाली होती आणि आता तो बहरिनला गेल्याची माहिती मिळत आहे. हा जर माणूस परत नाही आला तर इतक्या मोठ्या गोष्टी चौकशी थांबणार असल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. यामुळे आता पार्थ पवार यांच्या मागे पुन्हा एकदा चौकशीचा ससेमीरा लागण्याची शक्यता आहे.