छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा निष्काळजीपणा (फोटो सौजन्य - Justdial)
ठाणेः ठाणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारकडून १३५ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यातील ६० कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात पालिकेला प्राप्त झाल्यानंतरही पालिकेने अद्याप कळवा रुग्णालयातील ऑक्सिजन वाहिनी बसवण्यासाठी निविदा काढण्यासच टाळाटाळ केल्याचे निष्पन्न झाले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतली असून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
या रुग्णालयात एकूण १८ वार्ड असून त्यापैकी एका वार्डाचे काम पूर्ण झाले वाहिनीसाठी यंत्रणा उभारायचीच राहून गेली असून त्या ठिकाणी ऑक्सिजन वाहिनी बसवण्याची यंत्रणा उभारायचीच राहून गेल्याचे धक्कादायक रित्या समोर आले. अखेरीस पालिकेने नंतर त्या वॉर्डात तातडीने ऑक्सिजन पाहिनी बसवली, तरी देखील उर्वरित वॉर्डाची दुरुस्ती करताना त्या ठिकाणी ऑक्सिजन वाहिनी बसवण्याच्या निविदा काढण्यास रुग्णालय प्रशासनाने टाळाटाळ केल्याचे निष्पन्न झाले. आहे.
अनागोंदी कारभार चर्चेत
गेले काही दिवस कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अनागोंदी कारभार बर्चत आहे. ठाणे पालिकेचे हे रुग्णालय केवल ठाणेकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील व ग्रामीण जिल्ह्यातील गणासाठी सेवा देत असते कळया रुग्णालयाची घाटांची क्षमता ५०० होती ती आता ८४० एव्हढी वाढवण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही महिन्यापूर्वी निविदा काढून या रुग्णालयाचे काम देखील सुरू केले
अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी संतापले
तथापि रुग्णालयावर जिल्ह्यातील रुग्णांचा असलेला मोठा ताण लक्षात घेऊन संपूर्ण आरोग्य सेवा बंद न करता टप्प्याटप्प्याने बोर्डाच्या नूतनीकरणाचे काम करण्यात येत आहे. तथापि रुग्णालय प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे रुग्णांना तसेच रुग्णांचे नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी १३५ कोटींचा भरीव निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिल्यानंतरही रुग्णालयाचे व्यवस्थापन मात्र साचे ऑक्सिजन वाहिनी बसवण्याचया कामाची निविदा देखील काढण्यास टाळा करत असल्यामुळे अतिरिक्त आयुक्त संधि माळवी आज चांगले संतापले.
Newborn Baby Care: धक्कादायक! कळवा रुग्णालयात जून महिन्यात तब्बल 21 नवजात बालकांचा मृत्यू






