चिमुरड्या प्यायल्या गुडनाईट लिक्वीड (फोटो- istockphoto)
चिमुरड्या प्यायल्या गुडनाईट लिक्वीड
दोघीही सुखरूप बचावल्या; दापोली पोलिसांत नोंद
सामाजिक कार्यकर्त्यांसह डॉक्टरांचे प्रसंगावधान
दापोली: लहान मुलांवरती डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते, अन्यथा पालकांची मोठ्या माणसांची नजर चुकवून ही लहान मुले न कळत्या वयात काय करून बसतील याचा नेम नसतो. अशीच एक दुर्दैवी घटना कोकणात पुणे येथून रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड येथील प्रसिद्ध असलेल्या लोटस रिसॉर्ट या ठिकाणी पुणे बावधन परिसरातील असलेले त्रिपाठी नामक कुटुंब पर्यटनासाठी आले होते. या पर्यटकांच्या दोन जुळ्या चिमुकल्यांनी हॉटेलच्या रूममध्ये लावलेले मधील डासांना घालवण्यासाठी लावण्यात आलेले चक्क गुडनाईट लिक्वीड ओढून काढून त्यातील लिक्विड प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली. काही वेळातच हा सगळा धक्कादायक प्रकार त्यांच्या आई-वडील यांच्या लक्षात आला.
सामाजिक कार्यकर्त्यांसह डॉक्टरांचे प्रसंगावधान
त्यांनी तात्काळ याची माहिती लोटस रिसॉर्ट हॉटेल व्यवस्थापना दिली हॉटेल व्यवस्थापनानेही क्षणाचाही विलंब न लावता थेट गाडी काढून या मुलांना व पर्यटकांना घेऊन थेट दापोली येथील बाल रुग्णालय गाठले. मात्र दोन्ही ठिकाणी खाजगी बाल रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नव्हते. सायं. ७च्या सुमारास मुरुडच्या दिशेने निघालेली गाडी दापोलीकडे वेगाने आली, ही कार इतक्या वेगाने का आली, हे पाहण्यासाठी दापोलीतील बुरोडीनाका परिसरात उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते भाई झगडे, सुयोग घाग व स्वप्निल जोशी यांनी माहिती घेतली व तत्काळ त्यांनी मदत करण्यासाठी क्षणाचाही विलंब न लावता पुढाकार घेतला. व थेट शासकीय दापोली उपजिल्हा रुग्णालय गाठले. हा सर्वप्रकार दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पवन सावंत यांना सांगण्यात आला. त्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता, या दोन्ही बालकांवर तत्काळ उपचार सुरू करून प्रसंगावधान दाखवत दोघांचीही प्रकृती स्थिर केली.
निष्काळजीपणाचा कळस! कळवा रुग्णालयात ऑक्सिजन वाहिनी बसवण्यास टाळाटाळ
दोघीही सुखरूप बचावल्या; दापोली पोलिसांत नोंद
पुढील उपचाराकरता या दोन्ही मुलांना पुण्यात हलविण्यात आले. पालकांनी हॉटेल व्यवस्थापनाने केलेली धावपळ दापोलीतील सामाजिक कार्यकत्यांनी मदतीसाठी घेतलेला पुढाकार उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पठन सावंत यांनी दाखवलेली समयसूचकता, त्यामुळे या दोन्ही बालकांचे प्राण सुखरूप बचावले आहेत. या सगळ्या घटनेची नोंद दापोली उपजिल्हा रुग्णालय व दापोली पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.
कळवा रुग्णालयात ऑक्सिजन वाहिनी बसवण्यास टाळाटाळ
ठाणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारकडून १३५ कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यातील ६० कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात पालिकेला प्राप्त झाल्यानंतरही पालिकेने अद्याप कळवा रुग्णालयातील ऑक्सिजन वाहिनी बसवण्यासाठी निविदा काढण्यासच टाळाटाळ केल्याचे निष्पन्न झाले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतली असून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश बारोट तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.






