Anjali Damania target dhananjay and pankaja munde beed political news
Anjali Damania on Dhananjay Munde : बीड : राज्याच्या राजकारणामध्ये अनेकदा बीड हे चर्चेमध्ये असते. मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे हे चर्चेत आले असून बीडमधील घटनांमुळे त्यांच्या अडचणींमध्ये देखील वाढ झाली होती. यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा देखील द्यावा लागला. आता बीडमधील धनंजय मुंडे यांचे दहशतीचे राजकारण संपले आहे असे मोठे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या अनेकदा माजी मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बीड दौरा आणि त्यांची काही वक्तव्ये याचा दाखला देत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘धनंजय मुंडेंचं दहशतीचे राजकारण आता संपलंय. असं ट्विट मी काल केलं आणि त्याचं कारण आहे. पहिला मुद्दा म्हणजे बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार गेले असताना तिथे धनंजय मुंडे कुठेही दिसले नाहीत दुसरा मुद्दा म्हणजे अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले की, इथे कोणाचे बड्या बापाचा बेटा असला तरी सुद्धा त्याच्यावर कारवाई होईल. तिसरा डायलॉग त्यांचा की, आका असो काका असो सगळ्यांवर कारवाई होईल, असे अजित पवारांचे वक्तव्य आहे,’ असे म्हणत अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे विश्वासू मानले जाणारे राजाभाऊ मुंडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे. याबाबत अंजली दमानिया म्हणाल्या की, “एकदा माफ केलं जाईल, दोनदा केलं जाईल तिसऱ्या चौथ्यांदा जर झालं तर चौथ्यांदा थेट त्यांच्यावर मकोका घालावा ह्या ज्या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजाभाऊ मुंडे नावाच्या व्यक्तीला जे अजित पवार गटात घेतलं गेलं याचा अर्थ धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या कुटुंबाचं राजकारण आता संपलं आता वंजारी समाजाला जवळ ठेवण्यासाठी राजाभाऊ मुंडे ना घेतले गेले, पण या सगळ्या बोलण्यावरून आपल्याला दिसतंय की आता धनंजय मुंडे यांना कुठेही धारा मिळणार नाही,” असा मोठा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अंजली दमानिया म्हणाल्या की, “संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग मिळाला नाही ही बातमी आली कुठून ते स्पष्टपणे अजित पवार धनंजय मुंडेंना बाजूला करतात म्हणूनच धनंजय मुंडेनी थेट कार्यकर्त्यांद्वारे ही पेरली आहे. सगळ्यांच्या डोक्यात धनंजय मुंडे संपला ही गोष्ट गेली नाही पाहिजे म्हणून ही बातमी पेरण्यात आली आहे असं माझं क्लिअर कट म्हणणं आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा जनभावनामुळे घेतला गेला याच्यात काहीच दुमत नाही. कारण संतोष देशमुख यांचे जेव्हा फोटो बाहेर आले त्याच्यातली क्रुरता बाहेर आली आणि तो कृतांत करणारा कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा होता म्हणूनच त्यांचा राजीनामा घेतला गेला,” असे देखील अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.