राज-उद्धव युतीपूर्वीच वादाची ठिणगी; नाशिकच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
Nashik News: राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शहरातील रस्त्यांवरील खड्डे, वाढती गुन्हेगारी, अनियमित पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या मुद्द्यांवर या बैठकीत विशेष चर्चा झाली.
मात्र, या बैठकीत ठाकरे गटाचे दोन नेते – जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यात विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून तीव्र वाद झाला. या वादानंतर विनायक पांडे यांनी बैठकीतून निघून जाणे पसंत केले. यामुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या वादामुळे नाशिकमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्त्वाची मानली जात आहे.
AI मुळे 5 लाख नोकऱ्यावर गदा! TCS ने 12,000 कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर तज्ज्ञांचा इशारा
मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची संयुक्त बैठक नाशिकमधील शिवसेना कार्यालयात पार पडली. बैठकीदरम्यान दोन्ही पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आपले विचार मांडत होते. याच वेळी शिवसेना (ठाकरे गट) चे नेते जयंत दिंडे भाषणासाठी उभे राहिले. आपल्या भाषणाच्या शेवटी जयंत दिंडे यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात स्वतःचे विश्लेषण मांडले. त्यांनी नमूद केले की, नाशिक मध्यम मतदारसंघातून वसंत गीते यांचा पराभव झाला, यामागे प्रचारात काही मुद्द्यांचे योग्य नियोजन न झाल्याचे कारण होते.
“एमडी ड्रग्जसारख्या संवेदनशील विषयासह काही मुद्दे आम्ही चुकीच्या पद्धतीने हाताळले. जर हे मुद्दे प्रचारातून वगळले गेले असते, तर कदाचित विजय आपल्याकडे झुकला असता,” असे दिंडे यांनी स्पष्ट केले. याच वक्तव्यावरून उपस्थितांमध्ये वातावरण तापले आणि पुढे वादाच्या रूपात त्याचा विस्फोट झाला.
Uddhav Thackeray-Rahul Gandhi Meeting: दिल्लीतील चर्चांमागचं ‘राज’कारण; राहुल-उद्धव भेटीत काय ठरलं?
शहरातील स्थानिक प्रश्नांवर चर्चा सुरू असतानाच, बैठकीत वादाची ठिणगी पडली आणि वातावरण तापले. शिवसेना कार्यालयात ही बैठक झाली. यावेळी शिवसेना नेते जयंत दिंडे भाषणासाठी उभे राहिले. त्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवावर भाष्य करत, “नाशिक मध्यम मतदारसंघातून वसंत गीते यांचा पराभव झाला, त्यामागे एमडी ड्रग्जसारख्या मुद्द्यांची चुकीची हाताळणी जबाबदार होती. हे मुद्दे प्रचारातून वगळले असते, तर विजय शक्य होता,” असे मत व्यक्त केले.
दिंडे यांच्या या वक्तव्यावर वसंत गीते यांचे जवळचे सहकारी आणि माजी महापौर विनायक पांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “आम्ही गेल्या ४० वर्षांपासून लढा देतोय, मग आम्ही नेमकं केलं तरी काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कारण गीते आणि पांडे यांनी मिळून संपूर्ण प्रचाराची रणनीती आखली होती. वातावरण तणावपूर्ण होताच, जयंत दिंडे यांनी क्षमा मागून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या विनायक पांडे यांनी तातडीने बैठकीतून काढता पाय घेतला. त्यांचा निषेध नोंदवत त्यांनी कार्यालयातून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. या वादामुळे संभाव्य युतीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.