Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘संवादानेच प्रश्न सुटतात’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया, आंदोलनावर मांडली स्पष्ट भूमिका

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अण्णा हजारे यांनी संवाद आणि अहिंसेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा संदेश दिला. दरम्यान, CJP ने सरकारने सर्व प्रमुख मागण्या मान्य केल्याचा दावा करत आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली.

  • By विवेक
Updated On: Jul 25, 2026 | 09:45 PM
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; ICU मध्ये उपचार सुरू

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; ICU मध्ये उपचार सुरू

Follow Us
Follow Us:
  • धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया.
  • “संवाद आणि अहिंसेनेच प्रश्न सुटतात,” असा अण्णा हजारेंचा संदेश.
  • CJP ने सरकारने मागण्या मान्य केल्याचा दावा करत आंदोलन मागे
 

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर झालेल्या या घडामोडीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलन यशस्वी झाल्यानंतर कोणाचा विजय किंवा पराभव झाला, यापेक्षा समाजाच्या हितासाठी योग्य निर्णय होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, कोणताही प्रश्न संवादाच्या माध्यमातून सोडवता येतो. संघर्ष आवश्यक असला तरी तो शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गानेच व्हायला हवा. त्यांनी आपल्या आंदोलनांचा उल्लेख करत सांगितले की, त्यांनी आयुष्यात अनेक उपोषणे केली, मात्र कधीही हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही. समाजहितासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणे हीच खरी लोकशाही असल्याचे त्यांनी नमूद केले.

Big Breaking: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय; आता ‘हा’ नेता असणार देशाचा शिक्षण मंत्री

विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर आवाज उठवला आणि त्यातून मोठी चर्चा निर्माण झाली, असे सांगत अण्णा हजारे यांनी युवकांच्या सहभागाचेही कौतुक केले. त्याचवेळी सरकारने दडपशाहीऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.

यापूर्वी दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अण्णा हजारे यांनी अहिल्यानगर येथे मौन आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान त्यांनी नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि भरती प्रक्रियेतील अडचणींसारख्या प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली होती. नागरिकांच्या भावना समजून घेत संवादातून तोडगा काढणे ही लोकशाहीची खरी ताकद असल्याचे त्यांनी तेव्हाही म्हटले होते.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लोकशाहीचा विजय – पृथ्वीराज चव्हाण; विद्यार्थी, युवा आणि विरोधकांच्या एकजुटीच्या लढ्याचे यश

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने जंतर-मंतरवरील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. CJP चे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्याचा दावा केला.

CJP च्या म्हणण्यानुसार, शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणे आणि आंदोलनादरम्यान प्रभावित झालेल्यांना आर्थिक मदतीबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आणि त्यानंतरच्या राजकीय घडामोडींवर देशभरात चर्चा सुरू असून, अण्णा हजारेंनी दिलेला संवाद, संयम आणि अहिंसेचा संदेश या संपूर्ण प्रकरणात विशेष महत्त्वाचा मानला जात आहे.

Web Title: Anna hazare on dharmendra pradhan resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Anna Hajare
  • CJP Protest
  • Dharmendra Pradhan

संबंधित बातम्या

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक
1

CJP on PM Modi : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता थेट मोदींना टार्गेट; ‘दिमागी नक्सल’ शब्दावर कॉकरोच जनता पार्टी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.