
Ashish Shelar claims that Rohit Pawar won over bogus voters local body elections
Maharashtra Politics: मुंबई : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणूका होत असल्या तरी मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. महाविकास आघाडीसह मनसे पक्ष देखील यामध्ये सहभागी झाला आहे. निवडणूक आयोग मतदार याद्यांमध्ये घोळ करत असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात सर्व विरोधकांनी मिळून मोर्चा देखील काढला. यानंतर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाची एकप्रकारे पाठराखण केली आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधून विरोधकांवर निशाणा साधला आहे. भाजपच्या टीकांवर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले असून रोहित पवार यांच्या मतदार संघामध्ये दुबार मतदार असल्याचा दावा देखील आशिष शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी रोहित पवारांचा यांचा विजय देखील दुबार मतदानामुळे झालं असल्याचं आरोप केला आहे.आशिष शेलार म्हणाले की, रोहित पवार यांचा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ 1243 मतांनी विजय झाला. त्यांच्या या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची 5532 दुबार संख्या आहे असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांवर देखील आरोप केला आहे. साकोली विधानसभा मतदारसंघात नाना पटोले हे 208 मतांनी जिंकले . पण, त्यांच्या मतदारसंघात 477 दुबार मते ही मुस्लिमांची आहेत. त्याचबरोबर वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ वरुण सरदेसाई जिंकले 11,365 मतांनी. पण, त्यांच्या मतदारसंघात 13,313 हे मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदार आहेत. बीड विधानसभा मतदरासंघात संदीप क्षीरसागर जिंकले 5324 मतांनी/ 14,944 दुबार मुस्लिम मते आहे. मुंब्रा विधानसभेतील जितेंद्र आव्हाड 30,601 दुबार मुस्लिम मते झाले आहे. माळशिरस विधानसभा : उत्तम जानकर 4399 दुबार मुस्लिम मते मिळाली आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे आशिष शेलार म्हणाले की, लोकसभेत महाविकास आघाडीची मते 2 कोटी 50 लाख 15 हजार 819 इतकी होती. तर, लोकसभेत महायुतीला मिळालेली मते 2 कोटी 48 लाख 12 हजार 627 इतकी होती. हे अंतर होते, 2 लाख 3 हजार आणि 192 इतक्या मतांचे होते. आम्ही केवळ 31 विधानसभा मतदारसंघाचे विश्लेषण केले.यात केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा दुबार मतदारांची संख्या 2 लाख 25 हजार 791 इतकी असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपकडून संपूर्ण 288 मतदारसंघांवरही काम सुरू आहे. 16 लाख 84 हजार 256 मतदार आहेत. ही केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची दुबार संख्या असल्याचे शेलार यांनी म्हटले. ही संख्या मोठी असू शकते असा दावाही त्यांनी केला.