Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashish Shelar : जरांगे पाटलांच्या ऑडिओ बॉम्बवर भाजपची पहिली प्रतिक्रिया, उदय सामंतांच्या दाव्यानंतर आशिष शेलार मैदानात

Ashish Shelar : मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. उदय सामंत यांच्या दाव्यानंतर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत क्लिपमधील दावे फेटाळले आणि सखोल चौकशीची मागणी केली.

  • By विवेक
Updated On: Oct 22, 2026 | 06:08 PM
Ashish Shelar on Manoj Jarange audio Clip

Ashish Shelar on Manoj Jarange audio Clip

Follow Us
Follow Us:
  • जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
  • आशिष शेलारांनी उदय सामंतांचा दावा फेटाळला
  • ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी
 

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. अश्यातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत दाखवलेल्या ऑडिओ क्लिपमुळे अनेकांना धक्का बसला आहे. या कथित ऑडिओ क्लिपचे सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहे. यावरून आता महायुतीमध्येच तुतुमैमै व्हायला सुरवात झाली असल्याचे दिसत आहे. मंत्री उदय सामंत यांनी या ऑडिओ क्लिपवरून भाजप संबंधित व्यक्ती जबाबदार असल्याचे म्हटल्यानंतर आत भाजप नेते आशिष शेलार यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे.

या कथित ऑडिओ क्लिप वादावर आता भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली असून आशिष शेलार यांनी याप्रकरणात प्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Ashish Shelar)

नेमकं प्रकरण काय?

मनोज जरांगे यांनी असा दावा केला की, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत 500 कोटी रुपये दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या नेत्यांना सांगितल्याची कुजबूज पक्षात सुरू आहे. या दाव्यानंतर जरांगे यांनी काही कथित ऑडिओ क्लिप समोर आणल्या. या क्लिपमध्ये जरांगे यांच्याबाबत चर्चा होत असल्याचं निदर्शनास येत आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं

उदय सामंतांच्या दाव्यानंतर शेलारांची भूमिका

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंत्री आणि शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी संबंधित क्लिपमधील व्यक्ती भाजपाशी संबंधित असल्याचा दावा केल्याचं वृत्त आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत या क्लिपशी भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे हे मित्रपक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असल्याने त्यांच्याबाबत अशा प्रकारे प्रश्न उपस्थित करणं भाजपाला मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

ऑडिओ क्लिपची चौकशी करण्याची मागणी

क्लिपची सत्यता तपासलेली नाही आणि तिच्या विश्वासार्हतेबाबत स्पष्टता नाही, अशी भूमिका शेलार यांनी मांडली. जर क्लिपबाबत उदय सामंत यांचा काही गैरसमज झाला असेल, तर तो दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही त्यांनी म्हटलं. जरांगेंकडे उपलब्ध असलेली माहिती तपास यंत्रणांना द्यावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोप सुरू व्हायला सुरुवात झाली आहे, तरी कथित ऑडिओ क्लिपमधील आवाजांची ओळख, क्लिपची सत्यता याबाबत चौकशी होणे बाकी आहे. त्यामुळे आता चौकशीतून नेमकं काय समोर येतं, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Manoj Jarange Patil: ‘…अब जरांगे पाटील विधानसभा…’, जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपने राजकारण तापले! ५०० कोटींच्या उल्लेखाने नवा वाद

💡

Frequently Asked Questions

  • Que: मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंबाबत काय आरोप केला?

    Ans: मनोज जरांगे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत 500 कोटी रुपये दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या नेत्यांना सांगितल्याची कुजबूज सुरू असल्याचा दावा केला.

  • Que: आशिष शेलार यांनी ऑडिओ क्लिपबाबत काय म्हटलं?

    Ans: आशिष शेलार यांनी कथित ऑडिओ क्लिपशी भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा संबंध नसल्याचं सांगितलं. क्लिपची सत्यता तपासून सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

Web Title: Ashish shelar reacts on manoj jarange audio clip controversy vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Manoj Jarange Patil
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं
1

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांचा 500 कोटींचा ऑडिओ बॉम्ब अन् शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव, ऑडिओ क्लिपमुळे राजकारण तापलं

Manoj Jarange Patil: ‘…अब जरांगे पाटील विधानसभा…’, जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपने राजकारण तापले! ५०० कोटींच्या उल्लेखाने नवा वाद
2

Manoj Jarange Patil: ‘…अब जरांगे पाटील विधानसभा…’, जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपने राजकारण तापले! ५०० कोटींच्या उल्लेखाने नवा वाद

Ramdas Kadam : ‘मला तुम्ही 500 कोटी दिले का?’ मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना सवाल; रामदास कदमांचं प्रत्युत्तर
3

Ramdas Kadam : ‘मला तुम्ही 500 कोटी दिले का?’ मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना सवाल; रामदास कदमांचं प्रत्युत्तर

Manoj Jarange Patil Dasara Melava : नारायणगडावरून जरांगे पाटलांचा एल्गार! शेतकऱ्यांसाठी सरकारकडे 5 मोठ्या मागण्या
4

Manoj Jarange Patil Dasara Melava : नारायणगडावरून जरांगे पाटलांचा एल्गार! शेतकऱ्यांसाठी सरकारकडे 5 मोठ्या मागण्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.