Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nitin Gadkari News: ‘माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, एक शक्तीशाली लॉबी माझ्याविरोधात…’; नितींन गडकरींनी आरोपांना दिले उत्तर

कच्च्या तेलाच्या आयातीतून सुमारे २२ लाख कोटी रुपये देशातून बाहेर जात होते. पण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या निर्णयामुळे काहींच्या व्यवसायावर परिणाम झाला आणि त्यांनी संतापून माझ्याविरुद्ध बातम्या पसरवण्यास सुरुवात केली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 30, 2025 | 10:23 AM
Nitin Gadkari News: ‘माझी बदनामी करण्याचा प्रयत्न, एक शक्तीशाली लॉबी माझ्याविरोधात…’;  नितींन गडकरींनी आरोपांना दिले उत्तर
Follow Us
Close
Follow Us:

Nitin Gadkari News :  “माझ्या एका निर्णयामुळे एक शक्तीशाली आयात लॉबी नाराज झाली झाली असून माझी बदनामी करण्यासाठी  हे सर्व  षडयंत्र रचले जात आहे.  कच्च्या तेलाच्या आयातीमुळे देशातून जवळपास २२ लाख कोटी रुपये बाहेर जात होते. या निर्णयामुळे काहींच्या व्यवसायावर परिणाम झाला असून, त्यामुळे ते नाराजीने बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र मी आजवर कुठल्याही ठेकेदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही. त्यामुळेच ठेकेदार मला घाबरत आहेत, अशा शब्दांत  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  त्यांच्यावरील आरोपांवर उत्तर दिले आहे.

पेट्रोल-इथेनॉल मिश्रणावरील आरोपांवर गडकरींची प्रतिक्रिया

पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याबाबत करण्यात येणाऱ्या आरोपांवर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत. या आरोपांना उत्तर देत गडकरींनी मौन सोडले आहे. ही टीका त्यांच्या निर्णयांमुळे नाराज झालेल्या एका शक्तिशाली आयात लॉबीची कारस्थान आहे. पण मी अशा टीकेला उत्तर देत नाही, कारण त्यामुळेच ती बातमी होते. लोक नेहमी फळ लागलेल्या झाडावरच दगडे मारतात. त्यामुळे अशा आरोपांकडे दुर्लक्ष करणेच योग्य आहे.

India W vs Sri Lanka W CWC : पहिल्या जेतेपदासाठी भारतीय संघाच्या प्रवासाला होणार सुरुवात! मानधनाचे लक्ष या विक्रमावर

शेतकऱ्यांना ऊर्जा उत्पादक बनवणे

इथेनॉल मिश्रणाला चालना देणे, शेतकऱ्यांना ऊर्जा उत्पादक बनवणे आणि प्रदूषण कमी करणे हा यामगचा सरकारचा उद्देश आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्यामुळे इंधन आयातीवर अवलंबून असणाऱ्या काही हितसंबंधींचे नुकसान झाले असून, त्यातूनच हे आरोप केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गडकरी म्हणाले, “कच्च्या तेलाच्या आयातीतून सुमारे २२ लाख कोटी रुपये देशातून बाहेर जात होते. पण पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या निर्णयामुळे काहींच्या व्यवसायावर परिणाम झाला आणि त्यांनी संतापून माझ्याविरुद्ध बातम्या पसरवण्यास सुरुवात केली. आजपर्यंत मी कोणत्याही कंत्राटदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही. त्यामुळेच कंत्राटदार मला घाबरतात.”

गडकरी म्हणाले, ‘हे आरोप हे केवळ राजकारणाचा भाग आहेत आणि आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहोत. मी कधीही कोणत्याही ठेकेदाराकडून एक पैसाही घेतलेला नाही, म्हणूनच त्यांना माझी भिती आहे. लोकांना सत्य माहिती आहे आणि यापूर्वीही मी अशा परिस्थितींचा सामना केला आहे.” पण दुसरीकडे, सीआयएएन अॅग्रोची वाढ ही फक्त इथेनॉल विक्रीमुळे नव्हे, तर नव्या व्यवसायांसह विविध उत्पन्न स्रोतांमुळे झाल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.

मानहानी प्रकरणात कंगनावर न्यायालयाची कडक कारवाई, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची केली विनंती

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हे स्पष्टीकरण त्यांचे पुत्र निखिल गडकरी यांच्या मालकीच्या सीआयएएन अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजच्या झपाट्याने वाढलेल्या महसुल आणि नफ्यावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे. निखील गडकरी यांची ही कंपनी प्रामुख्याने इथेनॉल उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहे.

निखिल गडकरी यांच्या या कंपनीच्या उत्पन्नावरून अनेक प्र्श्न टि आहेत. एप्रिल–जून 2025 या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 510.8 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले, जे एक वर्षापूर्वी केवळ 17.47 कोटी रुपये होते. नफ्यातही मोठी उसळी घेत कंपनीने अल्प पातळीवरून 52 कोटी रुपयांहून अधिक नफा नोंदवला. शेअर बाजारातही कंपनीच्या शेअरकिमतीत मोठी झेप पाहायला मिळाली असून, एका वर्षात ती 172 रुपयांवरून वाढून तब्बल 2,023 रुपयांवर पोहोचली आहे.

 

Web Title: Attempt to defame me a powerful lobby against me nitin gadkari responds to allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 10:23 AM

Topics:  

  • national news
  • Nitin Gadkari
  • petrol

संबंधित बातम्या

Nagpur News: नागपूरची सिलिंडरमुक्तीकडे वाटचाल; नितीन गडकरींकडून HCGच्या CGS कम मदर स्टेशनचे उद्घाटन
1

Nagpur News: नागपूरची सिलिंडरमुक्तीकडे वाटचाल; नितीन गडकरींकडून HCGच्या CGS कम मदर स्टेशनचे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.