Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंमध्ये’; बच्चू कडूंचा मोठा दावा, ठाकरे-शिंदे गटाच्या सुनावणीवर म्हणाले…

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना आमदार बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे. न्यायालय एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • By विवेक
Updated On: Aug 11, 2026 | 09:19 PM
Bachchu Kadu

Bachchu Kadu

Follow Us
Follow Us:
  • धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदे यांच्यात असल्याचा बच्चू कडूंचा दावा.
  • कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रावर प्रश्न उपस्थित केला.
  • शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात; पुढील सुनावणी १२ ऑगस्टला.
 

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या प्रकरणात ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आणि त्याच्या अधिकारक्षेत्रावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

दरम्यान, या सुनावणीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूनेच लागेल, असा दावा कडू यांनी केला. ते चंद्रपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

‘धनुष्यबाण फक्त शिंदेच पेलू शकतात’

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत विचारले असता बच्चू कडू यांनी धनुष्यबाण चिन्हावर आपला विश्वास व्यक्त केला. त्यांच्या मते, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदे यांच्यात आहे. न्यायालयालाही ही बाब माहिती असल्याने निकाल शिंदे यांच्या बाजूनेच लागेल, असा दावा त्यांनी केला.

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’

मात्र, या प्रकरणावर अद्याप सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे कडू यांच्या दाव्याकडे राजकीय प्रतिक्रिया म्हणून पाहिले जात आहे.

कपिल सिब्बलांचा निवडणूक आयोगावर सवाल

दरम्यान, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. शिवसेनेच्या १९९९ च्या पक्षघटनेत ‘मुख्य नेता’ असे पद अस्तित्वात नसताना एकनाथ शिंदे यांनी स्वतःला हे पद कोणत्या आधारावर बहाल केले, असा सवाल सिब्बल यांनी केला.

पक्षातील फूट आणि त्यानंतर झालेल्या नियुक्त्यांचा संदर्भ देत निवडणूक आयोगाने काही बाबी ग्राह्य धरल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न हा दहाव्या अनुसूचीअंतर्गत विधिमंडळ अध्यक्षांच्या अधिकारक्षेत्रातील असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

‘ऐतिहासिक निर्णयाची आशा, आम्हाला न्याय मिळेल’, शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा

‘फुटीचा निर्णय निवडणूक आयोगाच्या अधिकारात नाही’

पक्षातील फूट सोडवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का, यावरही कपिल सिब्बल यांनी प्रश्न उपस्थित केला. शिवसेनेतील फुटीनंतर आयोगाने धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आणि ठाकरे गटाला मशाल हे पर्यायी चिन्ह दिले. हा निर्णय कायदेशीर तरतुदींशी सुसंगत नसल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.

सुनावणी आता अंतिम टप्प्यात असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दोन्ही गटांसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार असून, या प्रकरणातील न्यायालयीन भूमिका राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ठरू शकते.

Web Title: Bachchu kadu eknath shinde bow arrow symbol supreme court shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 09:19 PM

Topics:  

  • Bachchu Kadu
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
1

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
3

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
4

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.