Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

Vasant Davkhare CD Case: 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या सभेत वसंत डावखरे यांच्याशी संबंधित वादग्रस्त CD दाखवल्याच्या प्रकरणाचा 17 वर्षांनंतर निकाल लागला. कल्याण न्यायालयाने उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांची निर्दोष मुक्तता केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 23, 2026 | 02:37 PM
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

Follow Us
Follow Us:
  • 17 वर्षांच्या खटल्याचा अखेर निकाल!
  • वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा निकाल
  • 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
Vasant Davkhare CD Case: राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या दिवंगत नेते वसंत डावखरे यांच्या मानहानी खटल्याचा तब्बल 17 वर्षांनंतर निकाल लागला आहे. कल्याण न्यायालयाने उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर या चौघांची निर्दोष मुक्तता केली. 23 सप्टेंबर 2026 रोजी हा निकाल देण्यात आला.

2009 पासून सुरू होता खटला

हे प्रकरण 2009 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे. त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघात वसंत डावखरे आणि आनंद परांजपे यांच्यात निवडणूक लढत झाली होती. 22 एप्रिल 2009 रोजी परांजपे यांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत तत्कालीन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी डावखरे यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेला एक व्हिडिओ/CD सार्वजनिकरीत्या दाखवला होता.

Raj Thackeray: ‘२००० सालानंतर महाराष्ट्रात जात इतकी फोफावली…’, IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येवर राज ठाकरेंची पोस्ट

त्या व्हिडिओतील वक्तव्य आपले नसल्याचा दावा वसंत डावखरे यांनी केला होता. तसेच व्हिडिओ निवडक पद्धतीने एडिट करून आपली बदनामी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात मानहानीचे प्रकरण न्यायालयात पोहोचले.

20 हून अधिक साक्षीदारांची साक्ष

जवळपास 17 वर्षे चाललेल्या या प्रकरणात 20 हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे जबाब व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवण्यात आले होते. आरोपींकडून आरोप फेटाळण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 23 सप्टेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

नेमके प्रकरण काय?

हे प्रकरण 2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानचे आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात शिवसेनेची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वसंत डावखरे, तर शिवसेनेकडून आनंद परांजपे निवडणुकीच्या मैदानात होते. 22 एप्रिल 2009 रोजी झालेल्या प्रचारसभेत डावखरे यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलेला एक व्हिडिओ/CD दाखवण्यात आला होता.

या व्हिडिओमध्ये डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगता प्रयत्न करण्यास सांगत असल्याचे दाखवण्यात आले होते. मात्र, डावखरे यांनी व्हिडिओतील वक्तव्य नाकारले होते. व्हिडिओ निवडक पद्धतीने एडिट करून बदनामीसाठी वापरल्याचा त्यांचा आरोप होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.

चौघांची निर्दोष मुक्तता

अंतिम निकालात न्यायालयाने उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर या चौघांची निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे 2009 च्या निवडणुकीपासून सुरू असलेल्या या दीर्घकाळ चाललेल्या प्रकरणावर न्यायालयीन स्तरावर पडदा पडला आहे.

‘आता आम्हाला न्याय मिळाला’

निकालानंतर आनंद परांजपे यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या 17 वर्षांपासून ही केस सुरू होती आणि आता न्याय मिळाल्याचे त्यांनी म्हटले. तसेच वसंत डावखरे हे तेव्हाही आपल्यासाठी आदरणीय होते आणि आजही आदरणीय आहेत, अशी प्रतिक्रिया परांजपे यांनी दिली.

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Web Title: Vasant davkhare defamation case verdict uddhav thackeray eknath shinde acquitted kalyan court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
1

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?
2

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
3

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?
4

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.