Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी कर्जमाफी मंजूर तरीही बच्चू कडू आंदोलनावर ठाम, “केवळ कर्जमाफी करून चालणार नाही तर…”

शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेत राज्य सरकारने घेतला आहे. शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी याबाबत सरकारचे आभार मानले असून एका विशिष्ट मागणीसाठी आंदोलनाचा लढा कायम ठेवणार असल्याचे म्हंटले आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 02, 2026 | 06:13 PM
Bachchu Kadu, Maharashtra Government grants Farmers Loan waver, Maharashtra Government, Farmers Loan waver

Bachchu Kadu, Maharashtra Government grants Farmers Loan waver, Maharashtra Government, Farmers Loan waver

Follow Us
Follow Us:

राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेत राज्य सरकारने घेतला आहे. कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबतीत शिक्कामोर्तब करण्यात आले असून २ लाक रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैंठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आगामी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असे असतानाच शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी याबाबत सरकारचे आभार मानले असून एका विशिष्ट मागणीसाठी आंदोलनाचा लढा कायम ठेवणार असल्याचे म्हंटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅबिनेट मिटिंग घेण्यात आली. त्यात शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून सहकार विभागाकडून अटी व शर्तीनंतर कर्जमाफी केली जाईल. मात्र राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकांमुळे लागलेल्या आचारसहिंतेमुळे या निर्णयाची अद्याप घोषणा करण्यात आली नाही. या निर्णयानंतर दोन लाख रुपयांच्या मर्यादेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेवर आज कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत पीक कर्ज माफी देण्यात येईल. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २ लाकडं रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकार कडून प्रोत्सहन देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान राज्य सरकार देणार आहे. म्हणजेच त्यांचे अतिकरिक्त ५० हजार रुपयांचे कर्ज माफ होईल.

Maharashtra Political: महायुतीमध्ये वाढती दरी! फडणवीसांच्या बैठकीला शिंदे अनुपस्थित; जागावाटपाचा वाद चिघळला

बच्चू कडू ‘त्या’ एका मागणीवर ठाम

सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आज कर्जमाफीचा निर्णय झाला त्याबद्दल मी देवभाऊ आणि खास करून अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानतो. जो जो कार्यकर्ता या लढाईत सहभागी झाला होता, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली. परंतु, प्रोत्साहनपर निधी ५० हजार आहे तो एक लाख करावा यासाठी बच्चू कडूचा लढा कायम राहील. हि कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत येईल आणि त्यांच्या घराचं आयुष्य बदलणारी राहील अशी आशा करतो. केवळ कर्जमाफी करून चालणार नाही तर हमीभावाच्या लढाईतसुद्धा माझा शेतकरी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही,” असे ते यावेळी म्हणाले.

सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना होणार फायदा

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांमुळे आचारसंहिता चालू आहे. हि आचारसंहिता संपल्यावर राज्यात हि कर्जमाफी लागू केली जाणार आहे. कॅबिनेट बैठकीत या कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली असली तरी अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. या निर्णयाद्वारे ६५ लाखांवर कर्जखात्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे थेट ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार? वर्षा गायकवाड यांचे गंभीर आरोप

Web Title: Bachchu kadu statement over maharashtra government grants farmers loan waver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • Bachchu Kadu
  • Farmer Loan Waiver
  • Maharashtra Govenment

संबंधित बातम्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार? वर्षा गायकवाड यांचे गंभीर आरोप
1

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार? वर्षा गायकवाड यांचे गंभीर आरोप

मोठी बातमी ! शेतकरी कर्जमाफीवर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब, ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार फायदा
2

मोठी बातमी ! शेतकरी कर्जमाफीवर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब, ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार फायदा

बुलढाणा शहरात काँग्रेसकडून भव्य आसूड मोर्चा, वाढती महागाई, इंधन टंचाई, नीटपेपरफुटी वरून काँग्रेसचे जोरदार आंदोलन
3

बुलढाणा शहरात काँग्रेसकडून भव्य आसूड मोर्चा, वाढती महागाई, इंधन टंचाई, नीटपेपरफुटी वरून काँग्रेसचे जोरदार आंदोलन

लाडकी बहीण योजनेतून तब्बल १.२५ कोटीहून अधिक महिलांना अपात्र, सुप्रिया सुळेंचा खळबळजनक दावा
4

लाडकी बहीण योजनेतून तब्बल १.२५ कोटीहून अधिक महिलांना अपात्र, सुप्रिया सुळेंचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.