
Balasaheb Thackeray Birth Anniversary
मुंबई : शिवसेनाप्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट अशी ओळख असलेले बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक विचार, एक धगधगती ज्वाला आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाचं प्रतीक होते. त्यांनी मराठी माणसासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. वेळप्रसंगी आक्रमकही झाल्याचे आपण पाहिले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांची ओळख फक्त राजकीय जीवनापुरती मर्यादित नव्हती. तर त्यांचे सामाजिक क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांची ओळख त्यांचा स्पष्टवक्तेपणा, निर्भीड भूमिका आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी उभ्या ठाकलेल्या नेतृत्वामुळे होती. त्यांनी कधीही शब्द फिरवले नाहीत. जे वाटलं ते थेट मांडलं. त्यामुळेच त्यांचे विचार आजही तरुणाईला, सामान्य माणसाला आणि समाजाला दिशा देतात. हिंदुत्व, स्वाभिमान, अन्यायाविरोधातील संघर्ष आणि सत्तेपेक्षा तत्वांना महत्त्व ही त्यांच्या विचारांची मूळ सूत्रे होती.
हेदेखील वाचा : भरणे-पाटील मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार? इंदापुरातील अनपेक्षित समीकरणांमुळे राजकारणाला नवे वळण
बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी झाला. ते उत्तम व्यंगचित्रकार होते. त्यांनी फ्री प्रेस जर्नलमध्ये काम केले होते. त्यांनी समाज आणि राजकारणावर आपल्या रेषांमधून प्रहार केला. ‘मार्मिक’च्या माध्यमातून मराठी माणसाच्या प्रश्नांना आवाज दिला आणि 1966 मध्ये शिवसेनेची स्थापना केली. मुंबईत मराठी माणूस दुर्लक्षित होऊ नये, यासाठी शिवसेना उभी राहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव फक्त राज्यातच नाही तर देशभरात होते. त्यांनी त्यांची आणि पक्षाची अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती.
कधीही घेतले नाही कोणतेही मोठं पद
शिवसेनाप्रमुख याशिवाय राजकारणात त्यांची कोणतीही पदं घेतली नाहीत. मुख्यमंत्री असो वा लोकसभा अध्यक्ष यांसारख्या महत्त्वाच्या पदांवर त्यांनी पक्षातील नेत्यांना संधी दिली होती.
हेदेखील वाचा : Basant Panchami 2026: देवी सरस्वतीला खुश करण्यासाठी या मिठाईंचा दाखवा नैवेद्य, पूर्ण होईल पूजा