Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेत शिंदेगटाच्या खासदाराचा मोठा दावा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या चर्चेला वेग आला असताना शिंदे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी आपल्या मंत्रिपदाच्या दाव्याबाबत मोठे विधान केले आहे. पक्षाने नाव सुचवल्यास संधी मिळेल, असे सांगत त्यांनी संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के असल्याचे म्हटले.

  • By विवेक
Updated On: Aug 22, 2026 | 06:47 PM
bandu jadhav

bandu jadhav

Follow Us
Follow Us:
  • केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याचे चान्सेस 100% असल्याचा बंडू जाधवांचा दावा.
  • 30 ऑगस्टला एकनाथ शिंदे परभणीत शेतकरी शिवसैनिक संवाद मेळाव्यात सहभागी होणार.
  • ठाकरे गटाकडून आलेल्या नोटीसच्या विषयावर पक्षाचे वकील योग्य ती भूमिका मांडतील – जाधव
 

केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या संभाव्य विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाट्याला आणखी मंत्रिपदे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय बंडू जाधव यांची नावे चर्चेत असल्याचे बोलले जात आहे.

याबाबत बंडू जाधव यांना विचारले असता त्यांनी आपल्या मंत्रिपदाच्या शक्यतेवर स्पष्टपणे भाष्य केले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा, हे भाजपचे वरिष्ठ नेते ठरवतील, असे त्यांनी सांगितले. मात्र, पक्षाने आपले नाव सुचवले तर मंत्रिपदाची संधी मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘मला संधी मिळण्याचे चान्सेस 100%’

“मला संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के आहेत, असे मला वाटते,” असे बंडू जाधव यांनी म्हटले. मात्र, अंतिम निर्णय पक्षाच्या नेतृत्वाच्या हातात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रिपदाच्या चर्चेत असलेल्या प्रत्येकालाच संधी मिळावी असे वाटणे स्वाभाविक आहे. ओमराजे निंबाळकर, बारणे यांच्यासह आपल्यालाही मंत्रिपदाची अपेक्षा असल्याचे जाधव यांनी सांगितले. मात्र, कोणाला संधी द्यायची किंवा नाही, हा निर्णय नेतृत्व घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘वारसाहक्काने पैसा मिळतो, पक्ष मिळत नाही’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

30 ऑगस्टला एकनाथ शिंदे परभणीत

दरम्यान, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे 30 ऑगस्ट रोजी परभणी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती बंडू जाधव यांनी दिली. यावेळी परभणीत शेतकरी शिवसैनिक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शिंदे हे स्थानिक शेतकरी आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या अडचणी, विकासकामे आणि स्थानिक प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. परभणी शहर आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकनाथ शिंदे यांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ठाकरे गटाच्या नोटीसवर काय म्हणाले?

शिवसेना ठाकरे गटाकडून काही खासदारांना नोटीस बजावण्यात आल्याच्या मुद्द्यावरही जाधव यांनी भाष्य केले. हा विषय पक्षाच्या पातळीवर हाताळला जात असून, पक्षाने यासाठी वकिलांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. आपण शिवसेनेच्या भूमिकेसोबत जाताना भविष्यातील कायदेशीर आणि राजकीय आव्हानांचा विचार केला होता. त्यामुळे पुढे येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचे बंडू जाधव यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला किती प्रतिनिधित्व मिळते आणि त्यामध्ये बंडू जाधव यांना संधी मिळते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नाशिक कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या खर्चाचा डीपीआर आधी जाहीर करा, जनतेच्या पैशाचा हिशोब पारदर्शक हवा – पृथ्वीराज चव्हाण

Web Title: Bandu jadhav central cabinet expansion eknath shinde shivsena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 06:47 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
1

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
2

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश
3

Taneji Sawant : अखेर सावंत परिवारातील दुरावा मिटला; पुन्हा एकजुटीचा संदेश

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका
4

Pradeep Purnekar Murder Case : ‘स्वतःला ठाण्याचा मसीहा समजणारे कुठे गेले?’ अंबादास दानवेंची एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.