Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Assembly bypoll Elections 2026: ‘आजोबा लवकर बरे व्हा!’ रुग्णालयात असलेल्या शरद पवारांसाठी पार्थ पवारांचे खास ट्विट

बारामतीमध्ये एकीकडे पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असताना, दुसरीकडे दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 23, 2026 | 01:48 PM
Baramati Assembly bypoll Elections 2026:

Baramati Assembly bypoll Elections 2026:

Follow Us
Follow Us:
  • शरद पवार हे प्रकृती अस्वस्थतेमुळे मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
  • पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्यासाठी खास ट्विट
  • आजोबा लवकर बरे व्हा- पार्थ पवार
Baramati Assembly bypoll Elections 2026: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रकृती अस्वस्थतेमुळे मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली आहे.

“या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. मात्र, दुर्दैवाने प्रकृती बिघडल्याने मला मुंबईतील रुग्णालयात दाखल व्हावे लागले.” असे शरद पवार यांनी म्हटले आहे. डॉक्टरांनी उपचार सुरू असल्याने आणि सक्तीची विश्रांती आवश्यक असल्यामुळे मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यंदा ते बारामतीत येऊन मतदान करू शकणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.

बारामतीमध्ये एकीकडे पोटनिवडणुकीसाठी मतदान होत असताना, दुसरीकडे दिवंगत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची काळजी व्यक्त केली आहे. पार्थ पवार यांनी त्यांच्या ट्विटर एक्सवर ट्विट करत शरद यांना लवकर बरे व्हा, असे ट्विट करत त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.

Baramati Assembly bypoll Elections 2026: ‘आजोबा लवकर बरे व्हा!’ रुग्णालयात असलेल्या शरद पवारांसाठी पार्थ पवारांचे खास ट्विट

पार्थ पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘आजोबा, लवकर बरे व्हा! तुम्हाला शक्ती , आराम आणि लवकरात लवकर बरे वाटावे, यासाठी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आम्ही सर्वजण तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहोत.’ असं पार्थ पवार यांनी म्हटले आहे.

Get well soon, Ajoba! Wishing you strength, comfort, and a speedy recovery. We are all praying for your good health 🙏@PawarSpeaks — Parth Sunetra Ajit Pawar (@parthajitpawar) April 22, 2026

शरद पवार यांनी या निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनाही पाठिंबा दिला आहे. सुनेत्रा पवार यांनीदेखील शरद पवार यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत त्यांना संदेश पाठवला आहे.” प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदरणीय पवारसाहेब बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे आहेत.’अस सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

सुनेत्रा पवार यांचे ट्विट

प्रकृती अस्वास्थ्यामुळे आदरणीय पवार साहेब बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानास उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र त्यांचे आशीर्वाद माझ्यासाठी आणि बारामतीकरांसाठी लाखमोलाचे आहेत. बारामतीसह महाराष्ट्राच्या व देशाच्या विकासात आदरणीय साहेबांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनीही विकासात्मक राजकारणाची समृद्ध परंपरा जपली.

Baramati Assembly bypoll Elections 2026: ‘जय पवार आले तर आमचे युगेंद्र पवार तयार!’; रोहित पवारांचे खळबळजनक विधान

आदरणीय साहेबांनी केलेल्या आवाहनाला बारामतीकर नक्कीच उत्स्फूर्त प्रतिसाद देतील. बारामतीची जनता विकासाच्या विचारांशी जोडलेली आहे आणि तीच दिशा पुढेही कायम राहील. आदरणीय साहेबांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, हीच मनःपूर्वक प्रार्थना!

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांना एक अत्यंत भावनिक आवाहन केले आहे. ही पोटनिवडणूक दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे होत असल्याने, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

शरद पवार म्हणाले की, त्यांच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत सुनेत्रा अजित पवार यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. स्व. अजित पवार यांनी बारामतीसाठी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना विजयी करणे, असे मत पवारांनी व्यक्त केले.

“बारामतीच्या मतदारांनी माझ्यावर आजवर प्रदीर्घ विश्वास ठेवला आहे. माझ्या या आवाहनाला बारामतीकर नक्कीच प्रतिसाद देतील, अशी मला खात्री आहे,” अशा शब्दांत त्यांनी मतदारांप्रती विश्वास व्यक्त केला.

Web Title: Baramati assembly bypoll elections 2026 get well soon ajoba parth pawars emotional tweet for sharad pawar amid baramati bypoll

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • parth pawar
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल
1

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी
2

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
3

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार
4

Maharashtra Breaking News Today 2026: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ९५ डॉलरच्या पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.