Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar Drought Tour : शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात! चार जिल्ह्यांत दुष्काळी दौरा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार

Sharad Pawar Drought Tour : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवारांचा चार जिल्ह्यांचा दौरा सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मदत, कर्जमाफी आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करणार आहेत.

  • By विवेक
Updated On: Nov 01, 2026 | 05:48 PM
Sharad Pawar on Drought

Sharad Pawar on Drought

Follow Us
Follow Us:
  • बारामतीतून शरद पवारांच्या दुष्काळी दौऱ्याला सुरुवात
  • सोलापूर, धाराशिव, बीडसह चार जिल्ह्यांचा दौरा
  • दौऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
 

बारामती : प्रतिनिधी राज्यात पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, अनेक भागांत पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी दौरा सुरू केला आहे. बारामतीतून या दौऱ्याला सुरुवात झाली असून, पुढील तीन दिवसांत सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतील परिस्थितीचा ते आढावा घेणार आहेत. (Sharad Pawar Drought Tour)

दुष्काळाचे संकट केवळ शेतीपुरते मर्यादित राहिलेले नाही. पिकांचे घटलेले उत्पादन, पाण्याची कमतरता, पशुधनासाठी चारा उपलब्ध करण्यातील अडचणी आणि शेतकऱ्यांवरील वाढता आर्थिक ताण, अशा विविध समस्यांना ग्रामीण भागाला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्यावर शरद पवार भर देणार आहेत.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची विजय शिवतारेंची मागणी

याआधी बारामती, पुरंदर, दौंड तालुक्यांतील परिस्थितीची पाहणी

यापूर्वी शरद पवार यांनी बारामती, पुरंदर आणि दौंड तालुक्यांतील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांसाठी चारा आणि आर्थिक मदतीचा प्रश्न मांडला होता. दुष्काळाच्या तीव्रतेनुसार शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली होती.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पवार यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विविध मागण्या केल्या आहेत. बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत, कर्जमाफी आणि दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी त्यांनी केली होती.

दौऱ्यानंतर शासनाकडे पाठपुरावा

चार जिल्ह्यांतील दौऱ्यादरम्यान शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून दुष्काळाची तीव्रता आणि स्थानिक गरजा जाणून घेतल्या जाणार आहेत. या दौऱ्यातून समोर येणाऱ्या समस्या आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा एकत्रित आढावा घेऊन शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, पाणी व चाऱ्याची व्यवस्था कशी होणार आणि नुकसानभरपाईबाबत शासन काय निर्णय घेणार, याकडे आता शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

पावसाने वाळणारी पिकं आता वाचणार? तूर, कपाशी आणि हळदीला सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय!

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरद पवार कोणत्या जिल्ह्यांचा दुष्काळी दौरा करणार आहेत?

    Ans: शरद पवार सोलापूर, धाराशिव, बीड आणि अहिल्यानगर या चार जिल्ह्यांचा दौरा करून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

  • Que: शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोणत्या मागण्या केल्या आहेत?

    Ans: बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत, कर्जमाफी आणि दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

  • Que: शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेणार आहेत?

    Ans: चार जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्या, पीक नुकसान, पाणीटंचाई, चारा उपलब्धता आणि आर्थिक मदतीच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

Web Title: Sharad pawar drought tour farmer issues devendra fadnavis meeting vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • drought news
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Baramati: गर्दीतून नजर पडली अन् शरद पवारांनी ताफा थांबवला; भवानीनगरमध्ये कामगार नेते युवराज रणवरेंची घेतली भेट
1

Baramati: गर्दीतून नजर पडली अन् शरद पवारांनी ताफा थांबवला; भवानीनगरमध्ये कामगार नेते युवराज रणवरेंची घेतली भेट

Sharad Pawar : ज्ञानेश कुमारांवर निर्णय का घेतला नाही? शरद पवारांचा केंद्र सरकारला सवाल; सुप्रिया सुळे दिल्लीत आंदोलनात सहभागी
2

Sharad Pawar : ज्ञानेश कुमारांवर निर्णय का घेतला नाही? शरद पवारांचा केंद्र सरकारला सवाल; सुप्रिया सुळे दिल्लीत आंदोलनात सहभागी

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल
3

Thane Mahayuti Rally : ठाण्यात फडणवीसांचा राहुल गांधींवर सर्वात मोठा हल्लाबोल! ‘चीनकडून पैसे का मिळतात?’ राहुल गांधींना थेट सवाल

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची विजय शिवतारेंची मागणी
4

शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? पुरंदर उपसा योजनेचे पाणी मोफत देण्याची विजय शिवतारेंची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.