Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sharad Pawar Drought Tour : शरद पवारांचा दुष्काळग्रस्तांसाठी मोठा निर्णय! तुळशी गावात पोहोचताच केली ५० लाखांची मदत

Sharad Pawar Drought Tour : माढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शरद पवार यांनी तुळशी गावाला भेट दिली. गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांची मदत दिली.

  • By विवेक
Updated On: Nov 01, 2026 | 09:31 PM
Sharad pawar drought tour (1)

Sharad pawar drought tour (1)

Follow Us
Follow Us:
  • शरद पवारांचा सोलापूरमधून दुष्काळ पाहणी दौरा सुरू
  • तुळशी ग्रामस्थांशी संवाद साधून पाणीटंचाईची परिस्थिती जाणून घेतली
  • सोलापूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत
 

सोलापूर : पाण्याअभावी गाव सोडण्याची वेळ आल्याचं सांगत ‘तुळशी गाव विकणे आहे’ असा बॅनर लावणाऱ्या माढा तालुक्यातील तुळशी गावात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भेट दिली. गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करत त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी त्यांनी ५० लाख रुपयांची मदत दिली. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. (Sharad Pawar Drought Tour)

राज्यातील दुष्काळी परिस्थिती जाणून घेण्यासाठी शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. याच माढा मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.

यावेळी पवार यांनी १९७२ च्या दुष्काळाची आठवण सांगितली. त्यावेळी आपण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दुष्काळग्रस्तांना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला होता, असं त्यांनी नमूद केलं.

शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात! चार जिल्ह्यांत दुष्काळी दौरा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार

‘तुळशी गाव विकणे आहे’ बॅनरची राज्यभर चर्चा

माढा तालुक्यातील तुळशी गावातील पाणीटंचाईने गंभीर रूप धारण केलं होतं. पिण्याच्या पाण्यासाठी होणारी धावपळ आणि दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणींकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी गाव विकण्याचा बॅनर लावला होता. या बॅनरची राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली होती. आता खुद्द शरद पवार गावात पोहोचल्याने ग्रामस्थांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या.

दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत

गावातील परिस्थिती जाणून घेतल्यानंतर शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. या मदतीसोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दुष्काळावर चर्चा

मराठवाड्यातील दुष्काळी दौरा पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. दुष्काळावर कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांना लेखी सूचना दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामती दौऱ्यावर येतील, तेव्हा सुप्रिया सुळे आणि धैर्यशील मोहिते-पाटील यांना शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी वेळ मिळावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Baramati: गर्दीतून नजर पडली अन् शरद पवारांनी ताफा थांबवला; भवानीनगरमध्ये कामगार नेते युवराज रणवरेंची घेतली भेट

💡

Frequently Asked Questions

  • Que: शरद पवार यांनी तुळशी गावाला भेट का दिली?

    Ans: माढा तालुक्यातील तुळशी गावात भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. याकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी 'तुळशी गाव विकणे आहे' असा बॅनर लावला होता. याच परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शरद पवार यांनी गावाला भेट दिली.

  • Que: शरद पवार यांनी दुष्काळग्रस्तांसाठी किती मदत दिली?

    Ans: शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांचा धनादेश खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

  • Que: शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत का?

    Ans: होय. मराठवाड्यातील दुष्काळी दौरा पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी आणि दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Web Title: Sharad pawar drought tour 50 lakh farmer aid solapur vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • drought news
  • NCP Sharad Pawar
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Wardha News : उन्हाळ्यात वर्ध्याची तहान कशी भागणार? ११ धरणांत फक्त ‘इतकाच’ पाणीसाठा, वर्धेकरांनो, आतापासूनच पाणी जपून वापरा
1

Wardha News : उन्हाळ्यात वर्ध्याची तहान कशी भागणार? ११ धरणांत फक्त ‘इतकाच’ पाणीसाठा, वर्धेकरांनो, आतापासूनच पाणी जपून वापरा

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना त्रास दिला तर आडवं करू!’ मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा
2

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना त्रास दिला तर आडवं करू!’ मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा

Baramati: गर्दीतून नजर पडली अन् शरद पवारांनी ताफा थांबवला; भवानीनगरमध्ये कामगार नेते युवराज रणवरेंची घेतली भेट
3

Baramati: गर्दीतून नजर पडली अन् शरद पवारांनी ताफा थांबवला; भवानीनगरमध्ये कामगार नेते युवराज रणवरेंची घेतली भेट

Sharad Pawar Drought Tour : शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात! चार जिल्ह्यांत दुष्काळी दौरा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार
4

Sharad Pawar Drought Tour : शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात! चार जिल्ह्यांत दुष्काळी दौरा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.