
Sharad Pawar Met Yuvraj Ranaware
Satara News : महायुतीचा धर्म पाळण्यासाठी जागांवर पाणी सोडले; शिवेंद्रराजेंची कबुली
शरद पवार यांनी रविवारी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चार तालुक्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली. बारामतीतील भेटीगाठी पूर्ण करून दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा ताफा इंदापूरच्या दिशेने रवाना झाला. हा ताफा भवानीनगरमार्गे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर युवराज रणवरे काही सहकाऱ्यांसह छत्रपती कारखान्याच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील पालखी महामार्गावर स्वागतासाठी थांबले होते.
सध्या कारखान्याचा ऊस गाळप हंगाम सुरू असल्याने परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांची मोठी वर्दळ होती. दुष्काळी दौऱ्याच्या व्यस्त कार्यक्रमामुळे पवार थांबतील की नाही, याबाबत रणवरे यांना खात्री नव्हती. मात्र, निरा डावा कालव्याचा पूल ओलांडून पेट्रोल पंपाजवळ आलेल्या पवार यांच्या नजरेस स्वागतासाठी थांबलेले रणवरे पडले आणि त्यांचा ताफा थांबला.
यावेळी रणवरे यांनी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना आपल्या भेटीची माहिती असल्याचे सांगितले. तसेच पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्या प्रचारावेळी त्यांच्या विजयासाठी भवानीमातेच्या चरणी प्रार्थना केल्याची आठवणही त्यांनी सांगितली.
शरद पवार यांचे कामगार क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगताना युवराज रणवरे म्हणाले की, कामगारांच्या वेतनवाढीसाठी पवार यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. त्यामुळे कामगार वर्ग त्यांचे योगदान कधीही विसरणार नाही. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कामगारांसाठी मोलाचे काम केले. पवार कुटुंबीय भवानीनगरमार्गे जातात, तेव्हा त्यांचे स्वागत करण्याची परंपरा आम्ही जपली आहे, असे रणवरे यांनी सांगितले.
Ans: शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चार तालुक्यांच्या दौऱ्याला सुरुवात केली होती.
Ans: दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी इंदापूरकडे जात असताना शरद पवार यांनी कामगार नेते युवराज रणवरेंना पाहताच आपला ताफा थांबवला.
Ans: शरद पवार यांनी छत्रपती सहकारी साखर कारखान्याजवळ कामगार नेते युवराज रणवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली.