Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati By- Election: अखेर बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी राज्याची धुरा हाती घेतली असून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्यामुळे चुरस निर्माण झाली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 10, 2026 | 11:08 AM
Baramati By- Election: अखेर बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार
Follow Us
Follow Us:
  • काँग्रेसने  बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेणार
  • सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेला काँग्रेस  उमेदवार आकाश मोरे
  • देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन
Baramati by election : बारामती :  बारामतीच्या राजकीय वर्तुळातून मोठी अपडेट समोर आली आहे. काँग्रेसने  बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारपर्यंत वरिष्ठांशी चर्चा करून अधिकृतरित्या अर्ज मागे घेतला जाईल, असे सांगितले जात आहे.   उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह आमदार रोहित पवार  यांनी काँग्रेसशी केलेल्या चर्चेनंतर अखेर काँग्रेसने आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.  दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी  थेट काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याशीही चर्चा केली.  त्यापूर्वी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशीही फोनद्वारे बातचीत केली होती.   

यासंंदर्भात बोलताना आकाश मोरे म्हणाले की, मला वरिष्ठांचा निर्णय मान्य असेल, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जो निर्णय सांगतील ते करू. पण अद्याप वरिष्ठांसोबत माझा कोणताही संपर्क झालेला नाही. सपकाळ साहेब आणि वडेट्टीवार साहेब जो निर्णय सांगतील तो मला मान्य करावा लागेल.  माझे अजून कोणाशीही बोलणे झालेले नाही. सकारात्मक  प्रतिसाद असतानाही लोकभावना जपायच्या असतात.  लोकांकडून मला सकारात्मक प्रतिसाद आहे.

Baramati by election : सुनेत्रा पवारांविरोधात लढणार की माघार घेणार? काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंचे मत काय?

 उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेला काँग्रेस  उमेदवार आकाश मोरे आज आपला अर्ज मागे घेण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार  यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारपर्यंत काँग्रेस आपला अधिकृत उमेदवार मागे घेण्याबाबत अंतिम निर्णय जाहीर करेल.

राजकीय नेत्यांच्या फोनाफोनीने बदलले समीकरण

बारामतीची ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गेल्या २४ तासांपासून मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. सुनेत्रा पवार यांनी स्वतः काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून आणि गाठीभेटी घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही काँग्रेसच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींशी या संदर्भात चर्चा केल्याचे समजते. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून राजकीय संस्कृती जपण्यासाठी ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती केली.

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “बारामतीतील एकूण परिस्थिती आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उमेदवारी पाहता, आम्ही ही निवडणूक लढवू नये, अशी आमच्या सर्व प्रमुख नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. काल प्रदेशाध्यक्षांसोबत झालेल्या चर्चेतही बहुतेकांनी माघारीची भूमिका मांडली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सध्या केंद्रीय नेतृत्वाशी संपर्कात आहेत. श्रेष्ठींची परवानगी मिळताच आज दुपारपर्यंत अधिकृतपणे अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.”

Viral Video: ड्रेसिंग रूममध्ये David Miller ला कोसळले रडू, तरळले अश्रू; हेमांग बदानीने दिला आधार

वेळेचे गणित आणि शेवटचा दिवस

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून हातात केवळ काही तास शिल्लक आहेत. जर काँग्रेसने आपला अर्ज मागे घेतला, तर सुनेत्रा पवार यांची विधानसभेवर बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत बारामतीकरांच्या भावनांचा विचार करून हा निर्णय घेतला जात असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Web Title: Baramati by election congress candidate akash more withdraws from baramati by election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati by-election
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Parth Pawar Engagement : पवार कुटुंबात पुन्हा एकदा शुभमंगल सावधान! पार्थ पवारांचा साखरपुडा ठरला, कोण आहेत भावी पत्नी?
1

Parth Pawar Engagement : पवार कुटुंबात पुन्हा एकदा शुभमंगल सावधान! पार्थ पवारांचा साखरपुडा ठरला, कोण आहेत भावी पत्नी?

Ajit Pawar: मोठी बातमी! अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ द्या; राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
2

Ajit Pawar: मोठी बातमी! अजितदादा पवार यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ द्या; राष्ट्रवादीच्या आमदारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

‘नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत द्या’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे महत्त्वपूर्ण निर्देश
3

‘नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत द्या’; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे महत्त्वपूर्ण निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.