Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati by election : सुनेत्रा पवारांसमोर आकाश मोरेंचे तगडे आव्हान? काँग्रेसने का दिली मोरेंना संधी?

Baramati Congress Candidate : अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक होत आहे. यासाठी काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. सुनेत्रा पवारांना आव्हान देणारे कोण आहेत आकाश मोरे?

  • By प्रीति माने
Updated On: Apr 06, 2026 | 12:24 PM
Baramati Congress Candidate Akash More Marathi information Baramati By election 2026

Baramati Congress Candidate Akash More Marathi information Baramati By election 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • बारामतीमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्जदाखल प्रक्रिया
  • बारामतीमध्ये काँग्रेसकडून आकाश विजय मोरे यांची उमेदवारी
  • कोण आहे आकाश मोरे?
Baramati by election : बारामती : दिवंगत नेते अजित पवार यांचे जानेवारी महिन्यामध्ये अपघाती निधन झाले. या घटनेनंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. अजित पवारांच्या निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता होती. तसेच घरातील व्यक्ती गेल्यामुळे शरद पवार यांच्या पक्षाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. मात्र महाविकास आघाडीमध्ये त्यांचा हा निर्णय मान्य झाला नाही. काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेत निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसकडून (Congress) बारामती पोटनिवडणुकीसाठी आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बारामतीमध्ये काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पवार कुटुंबाकडून आणि महायुतीकडून प्रयत्न सुरु होते. काँग्रेसने उमेदवार देऊ नये यासाठी स्वतः सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. अजित पवारांच्या निधनामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि काँग्रेसने उमेदनार देऊ नये अशी विनंती स्वतः सुनेत्रा पवारांनी केली होती. मात्र त्यानंतर देखील दिल्लीतून पत्रक जारी करत अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बारामती (२०१) विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या पोटनिवडणूकीत कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ॲड. आकाश विजयराव मोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लडेंगे जितेंगे …!#BaramatiByElection #MaharashtraPolitics pic.twitter.com/lUir2VpQ9r — Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 5, 2026

हे देखील वाचा : “अजितदादाच ही निवडणूक लढवतायेत असं…; सुनेत्रा काकींसाठी रोहित पवारांची भावनिक साद

कोण आहे आकाश मोरे?

बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले आकाश मोरे हे पेशाने वकील आहेत. आकाश मोरे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते सचिव देखील आहेत. आकाश मोरे यांनी बी.ए. एलएलबी हे शिक्षण पूर्ण केले असून गेल्या 15 वर्षांपासून बारामती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये वकिली करत आहेत. बारामतीमध्ये मोर्टी येथील आश्रम शाळेमध्ये सदस्य म्हणून कार्य करत आहेत. बारामतीमध्ये गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी ते वसतिगृह आणि आश्रमशाळा चालवतात.

हे देखील वाचा : शेवटच्या निर्णायक क्षणी सुनेत्रा पवारांचा राजकीय डाव; बारामतीसाठी सुनेत्रा पवारांचा थेट काँग्रेस प्रदेशाध्यांना फोन

आकाश मोरे विधानपरिषदेचे आमदार विजय मोरे यांचे पुत्र आहेत. आकाश मोरे यांनी यापूर्वी विधानसभेमध्ये नशीब आजमवले होते. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आकाश मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मोरे कुटुंब हे काँग्रेस पक्षातील निष्ठावंतांपैकी एक म्हणून ओळखले जातात. धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या मोरेंना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. बारामतीमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कॉंग्रेसने जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र बारामती ही नेहमीच पवारांचा गड म्हणून ओळखली जाते. त्यामुळे सुनेत्रा पवारांसमोर आकाश मोरे हे आव्हान देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Web Title: Baramati congress candidate akash more marathi information baramati by election 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Baramati by-election
  • Congress Maharashtra
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

आरोग्य विभागाच्या तसेच शासनाच्या विविध योजनांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा
1

आरोग्य विभागाच्या तसेच शासनाच्या विविध योजनांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा

NCP Politics: राष्ट्रवादीत नव्या चाणक्याची एन्ट्री ? सुनेत्रा आणि पार्थ पवारांनी घेतली गुप्त भेट
2

NCP Politics: राष्ट्रवादीत नव्या चाणक्याची एन्ट्री ? सुनेत्रा आणि पार्थ पवारांनी घेतली गुप्त भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.