Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati Plane Crash:  ‘ब्लॅक बॉक्स’मधील गुपिते उघड होणार? DFDR डेटा यशस्वीपणे डाउनलोड

  २८ जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर राजकीय पक्षांकडून सातत्याने हा अपघात नसून घातपात  असल्याचा आरोप केला जात आहे. 

  • By anuradha sagar
Updated On: Feb 20, 2026 | 12:42 PM
Baramati Plane Crash:  ‘ब्लॅक बॉक्स’मधील गुपिते उघड होणार? DFDR डेटा यशस्वीपणे डाउनलोड
Follow Us
Follow Us:
  • अजित पवार यांच्या निधनास कारणीभूत ठरलेल्या बारामती विमान अपघाताचा तपास आता निर्णायक टप्प्यावर
  •  अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट मॅन्युअल आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने (ICAO) ठरवलेल्या मानकांनुसार आणि शिफारस केलेल्या प्रक्रियांनुसार सुरू
  • ICAO मानकांनुसार, घटनेच्या 30 दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल जारी केला जाईल,
 

Baramati Plane Crash:  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनास कारणीभूत ठरलेल्या बारामती विमान अपघाताचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा मानल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक बॉक्स’मधील माहिती मिळवण्यात तपास यंत्रणांना अंशतः यश आले आहे. डीएफडीआर (DFDR) मधील डेटा यशस्वीपणे डाउनलोड झाला असला, तरी सीव्हीआर (CVR) मधील माहिती मिळवण्यासाठी आता परदेशी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.

२८ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या Learjet 45 (VT-SSK) विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) कडून केली जात आहे. असे स्पष्टीकरण नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने त्यांच्या आधीच्या विधानाचा संदर्भ देत स्पष्ट केलं आहे.  ही चौकशी एअरक्राफ्ट मॅन्युअल आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने (ICAO) ठरवलेल्या मानकांनुसार आणि शिफारस केलेल्या प्रक्रियांनुसार सुरू असल्याचेही एएआयबीने स्पष्ट केलं आहे. (Ajit Pawar Plane crash)

Rohit Pawar News: रोहित पवारांच्या जिवाला धोका कुणाकडून; नेमकं चाललंय काय?

  २८ जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर राजकीय पक्षांकडून सातत्याने हा अपघात नसून घातपात  असल्याचा आरोप केला जात आहे.  या प्रकरणावर मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

यानुसार या विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर बसवण्यात आले होते. L3 कम्युनिकेशन्सद्वारे निर्मित डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) मधील डेटा नवी दिल्लीतील AAIB कार्यालयात यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे.  पण उच्च तापमानामुळे हनीवेल-निर्मित कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) खूपच खराब झाला आहे आणि स्टेट ऑफ डिजाइन/मैन्युफैक्चर’ यांच्याकडून  तांत्रिक मदत मागवण्यात आली आहे.

तपासातील महत्त्वाचे अपडेट्स:

डीएफडीआर डेटा सुरक्षित: विमानाचा वेग, उंची आणि तांत्रिक स्थितीची नोंद करणाऱ्या ‘डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर’ (DFDR) मधील माहिती काढण्यात यश आले आहे. यामुळे अपघातापूर्वी विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता का, हे स्पष्ट होण्यास मदत होईल.

सीव्हीआर दुरुस्तीचे आव्हान: वैमानिकांमधील संवाद रेकॉर्ड करणाऱ्या ‘कॉ cockpit व्हाईस रेकॉर्डर’ (CVR) ला आगीमुळे किंवा आघातामुळे इजा झाली आहे. हा डेटा अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो मिळवण्यासाठी आता आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची किंवा संबंधित परदेशी कंपनीची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

घातपाताचा संशयाचा खुलासा होणार ? आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या प्रकरणात वैमानिकाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. सीव्हीआर दुरुस्त झाल्यानंतर वैमानिकांमधील शेवटच्या क्षणांतील संवाद समोर येईल, ज्यामुळे हा केवळ अपघात होता की घातपात, यावरून पडदा उठू शकेल.

राज्यसभा खासदारकीवरुन महाविकास आघाडीमध्ये वादंग? शरद पवार की उद्धव ठाकरे कोणाला मिळणार संधी?

विमानाच्या घटकांची प्रयोगशाळेत चाचणी

AAIB ची चौकशी पूर्णपणे तांत्रिक आणि पुराव्यावर आधारित आहे. त्यात विमानाच्या अवशेषांची सविस्तर तपासणी, ऑपरेशनल आणि देखभाल रेकॉर्डचे विश्लेषण आणि आवश्यक असल्यास विमानाच्या घटकांची प्रयोगशाळेत चाचणी समाविष्ट आहे.

ICAO मानकांनुसार, घटनेच्या 30 दिवसांच्या आत प्राथमिक अहवाल जारी केला जाईल, तर अंतिम अहवाल योग्य वेळी सादर केला जाईल.  4 फेब्रुवारी 2026 पासून VSR व्हेंचर्सचे विशेष ऑडिट सुरू करण्यात आले आहे आणि अहवालाच्या आधारे आवश्यक कारवाई केली जाईल. असेही  मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी तपास प्रक्रियेवर आणि तांत्रिक पुराव्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी बुधवारी अपघाताच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

 

Web Title: Baramati plane crash will the secrets of the black box be revealed dfdr data successfully downloaded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • rohit pawar

संबंधित बातम्या

Rajendra Pawar Message to Rohit Pawar: लढ संघर्ष अटळ आहे….;राजेंद्र पवारांची रोहित पवारांसाठी भावनिक पोस्ट
1

Rajendra Pawar Message to Rohit Pawar: लढ संघर्ष अटळ आहे….;राजेंद्र पवारांची रोहित पवारांसाठी भावनिक पोस्ट

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’
2

Bombay HC on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्ट संतापलं; ‘विद्यार्थी समाजकंटक नाहीत, त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे’

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं
3

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा
4

Rohit Pawar MPSC Protest Pune: …अन्यथा पुणे शहर बंद पाडू!”; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून रोहित पवारांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.