Beed Santosh Deshmukh murder case accused Valmik Karad's arms license cancelled
बीड : बीड जिल्ह्यामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये मास्टर माईंड म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर आले होते. वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये शरण आलेला असला तरी त्याचे अनेक प्रकरणं आता समोर येत आहे. यामुळे आता वाल्मिक कराडचा शस्त्रपरवाना रद्द करण्यात आला आहे.
बीड हत्या प्रकरणाच्या घटनेला एक महिना उलटला आहे. या संदर्भात आरोपींना अटक करण्यात आलेली असली तरी देखील सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण तापले असून अनेक सत्ताधारी नेत्यांनी देखील या संदर्भात आवाज उठवला आहे. त्यातच अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. यामुळे वाल्मिक कराडचा शस्त्रपरवाना रद्द करण्यात आला आहे.
राजकीय बातन्या वाचा एका क्लिकवर
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक दावे करुन व्हिडिओ शेअर केल्या होत्या. यामध्ये बीडमधील अनेक तरुणांचे बंदूक हातात घेताना, बंदुकीतून गोळ्या झाडतानाचे फोटो समोर आणले होते. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील तरुणांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले होते. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी बंदुकीसोबत ज्या कोणाचे फोटो आहेत, त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश दिले होते. यानंतर आता दोन आठवड्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना शस्त्र परवाना रद्द करण्याची नोटीस पाठवली आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये मास्टर माईंड आरोपी वाल्मिक कराड यांचाही शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. वाल्मिक हा सध्या सीआयडीच्या कोठडीत असल्याने त्याच्यापर्यंत अद्याप ही नोटीस पोहोचली नाही. मात्र कोठडीतून बाहेर आल्यानंतर वाल्मिकला नोटीस दिली जाणार आहे. वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. बीड़ हत्या प्रकरणातील तपासामध्ये हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
जनआक्रोश मोर्चा
मागील महिन्यात 9 डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधी आवाज उठवत होते. त्यानंतर राज्यभरामध्ये अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला. बीड आणि पुण्यानंतर आता धाराशिवमध्ये संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या जनआक्रोश मोर्चामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील, सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता या प्रकरणाचा जोरदार तपास सुरु असून वाल्मिक कराडचा शस्त्रपरवाना रद्द करण्यात आला आहे.