Photo Credit- Social Media मुख्यमंत्र्यांनी वर्षी बंगल्यावर न जाण्याचं नेमकंं कारण काय
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य सुरु असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीमध्ये दारूण पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते मित्रपक्षांवर आरोप करत आहे. यामध्ये ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आगामी निवडणूका या स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. यावर कॉंग्रेस नेत्यांनी व शरद पवार गटाच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर देखील दिले आहे. यावर माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी नेत्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.
मुंबईपासून ते नागपूरपर्यंत महापालिका निवडणुका कशा लढवायच्या यावर वरिष्ठांशी बोलून ठरवू, असे मत कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वर्षा गायकवाड यांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी पक्षातील विभागप्रमुख, जिल्हाप्रमुखांशी चर्चा केली. या चर्चेवेळी अनेकांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली. तीच आम्ही बोलून दाखवली. दुसरी गोष्ट म्हणजे, काँग्रेसच्या नेत्यांनी आमचे विधान व्यवस्थित ऐकायला हवे. ऐकण्याचीही सवय लावली पाहिजे. दुसऱ्याचे ऐकणे ही एक मोठी गोष्ट असते. मी एवढेच म्हणालो की, लोकसभेसाठी इंडिया आघाडी आणि विधानसभेसाठी महाविकास आघाडी बनवली होती. पण स्थानिक स्वराज संस्थेत कार्यकर्त्यांना न्याय मिळावा म्हणून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. जेणेकरून स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत होईल. यावर काँग्रेसला मिरची लागण्याचे कारण काय?” असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
महाविकास आघाडी तुटली आहे का? असा सवाल माध्यमांनी संजय राऊत यांना विचारला. संजय राऊत म्हणाले की, “इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी फुटली, असे शिवसेना (ठाकरे) पक्ष किंवा मी म्हटलेले नाही. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीबाबत आम्ही एक भूमिका मांडत आहोत. इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती, तर महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती. स्थानिक स्वराज संस्थेसाठी ही आघाडी नव्हती. आम्ही भाजपामध्ये असतानाही स्थानिक स्वराज संस्था स्वबळावर लढत होतो,” असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
बीड हत्या प्रकरणामध्ये आरोपींवर मोक्का लावला आहे. यावरुन देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, “या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री बोलतात कोणालाही सोडणार नाही पण मुख्य आरोपीला सोडलं आणि सगळ्यांना मोक्का लावला आहे. भाजपची राज्य करण्याची ही पद्धत आहे, मुख्य आकाला स्वतःकडे ठेवायचं आणि त्याच्या खालील लोकांवर कारवाई करायची. बीड, परभणीमध्ये जे घडलं आहे ते अत्यंत धोकादायक आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की ते न्याय करतील कारण ते न्याय आणि सत्याची भाषा करतात पण गुन्हेगारांना त्यांनी खपवून घेतलं आहे. वाल्मिक कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे, अशांना खपवून घेतले आहे आणि लहान मासे कापले आहेत,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.