Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड बैठकीनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी घडामोड

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीला लवकरच पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे, सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात झालेल्या चर्चेनंतर गोगावलेंकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 23, 2026 | 07:42 PM
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’

रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार? भरत गोगावले यांचा मोठा दावा; ‘आज नाव जाहीर होईल’

Follow Us
Follow Us:
  • एकनाथ शिंदे, सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात रायगड पालकमंत्रीपदावर महत्त्वाची बैठक
  • सूत्रांच्या माहितीनुसार भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता
  • रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, शिंदे आणि तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास
 

राज्यातील राजकीय वातावरण गरम असतानाच आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत असलेला तिढा आता सुटण्याची चिन्हे दिसत असून शिवसेना नेते आणि मंत्री भारत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आज (मंगळवार, 23 जून ) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री बारात गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बैठक पार पडली असून या बैठकीत गोगावलेंना रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे, त्यामउळे रायगडच्या पालकमंत्रीपदावरून गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय रस्सीखेचीला अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

बंद दाराआड बैठकीत काय झाली चर्चा?

मंगळवारी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत सविस्तर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीत रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांच्या नावावर सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे गोगावलेंना ही जबाबदारी मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Sharad Pawar Faction: महाराष्ट्रात पुन्हा भूकंप? उद्धव ठाकरेंसोबतच आता शरद पवारांचे ५ खासदार भाजपच्या संपर्कात!

बराच काळ सुरू होती रस्सीखेच

रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी महायुतीतील विविध नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात होते. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वारंवार भरत गोगावलेंकडेच ही जबाबदारी देण्याची मागणी केली होती. आज झालेल्या बैठकीनंतर या प्रश्नावर महायुतीतील प्रमुख नेत्यांमध्ये सहमती झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे लवकरच या विषयावर अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काय म्हणाले सुनील तटकरे?

रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत बोलताना सुनील तटकरे यांनी हा विषय लवकरच निकाली निघेल, असा विश्वास व्यक्त केला. “रायगडच्या पालकमंत्रीपदाचा विषय लवकरच संपुष्टात येईल. आज शिंदे साहेबांशी चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बसून अंतिम निर्णय घेतला जाईल. महायुतीतील सर्व पक्ष एकत्रितपणे यावर निर्णय घेतील,” असे तटकरे म्हणाले.

खासदारानंतर आता आमदारांचं ‘ऑपरेशन टायगर’? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी

शिंदेंनीही दिले संकेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल, असे स्पष्ट केले. “सुनील तटकरे आणि भरत गोगावले यांनी चर्चा केली आहे. मीदेखील मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल,” असे शिंदे यांनी सांगितले.

महायुतीतील प्रमुख नेत्यांकडून सकारात्मक संकेत मिळत असल्याने रायगडला लवकरच नवा पालकमंत्री मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अधिकृत घोषणा झाल्यास भरत गोगावले यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

Web Title: Bharat gogawale likely to be raigad guardian minister big update after meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Eknath Shinde
  • raigad
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना
2

Raigad News: माणगावकरांच्या नळाला गढूळ पाणी! नागरिक नाराज, नगरपंचायतीकडून तातडीच्या सूचना

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
3

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
4

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.