Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आरक्षणावरून जरांगे पुन्हा आक्रमक; ‘सरकार बदनाम करण्याचा प्रयत्न करेल’, भास्कर जाधवांचा गंभीर आरोप

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी सरकारवर निशाणा साधत जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोप केला.

  • By विवेक
Updated On: Aug 10, 2026 | 04:46 PM
Bhaskar Jadhav

Bhaskar Jadhav

Follow Us
Follow Us:
  • सरकारकडून प्रत्येकवेळी जरांगे पाटलांना आश्वासनं दिली जात असल्याचा भास्कर जाधवांचा आरोप
  • कुणबी नोंदी रद्द करण्याची चूक सरकारने मान्य करावी, अशी जरांगे पाटलांची मागणी
  • परभणीत रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने आई-बाळाच्या मृत्यूच्या घटनेवर सरकारवर कारवाईची मागणी
 

राज्यात मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू करत आरक्षणाच्या प्रश्नावर आरपारची लढाई लढण्याची भूमिका मांडली आहे. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याकडूनही जरांगे पाटलांच्या भूमिकेला प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारकडून यापूर्वी आश्वासनं देण्यात आली, मात्र त्यानंतरही मागण्या पूर्ण होत नसल्याचा आरोप जरांगे पाटील करत आहेत. यावरून विरोधकांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

‘जरांगेंना बदनाम करण्याचा प्रयत्न होईल’

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी या मुद्द्यावर राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार मनोज जरांगे पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू शकतं, असा दावा त्यांनी केला. “प्रत्येकवेळी वेगवेगळी लोकं समोर करून जरांगे पाटील यांना शब्द दिला जातो,” असा आरोप जाधव यांनी केला. सर्व पक्षांतील नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप त्यांची भेट का घेतली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

‘जो गद्दारी करेल तो मराठा जातीचा नाही’; आटपाडीच्या सभेत मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

पोलिस अधिकाऱ्यांच्या बढतीवरून फडणवीसांवर निशाणा

आंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईचा संदर्भ देत भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली. ज्या पोलिस अधिकाऱ्यावर गोळीबाराच्या घटनेशी संबंधित आरोप झाले, त्याला बढती देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसंच शंभूराज देसाई यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीलाही बढती देण्यात आल्याचा आरोप करत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

कुणबी प्रमाणपत्रांवरून सरकारला सवाल

कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या काही व्यक्तींची जात प्रमाणपत्रं रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. दिलेल्या नोंदी रद्द करण्याचा निर्णय चुकीचा होता, हे देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करावं, अशी त्यांची मागणी आहे.

तसंच चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत त्यांनी याबाबतही भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांच्या माध्यमातून झालेली चूक सुधारण्याची भूमिका घेतली, मग फडणवीस यांनीही तशी भूमिका का घेऊ नये, असा सवाल जरांगे पाटील यांनी उपस्थित केला.

Maratha Reservation Breaking Update: मराठा आरक्षण सुनावणी पुन्हा रखडणार? न्यायमूर्ती घुगेंच्या पदोन्नतीमुळे पेच वाढणार

परभणीतील घटनेवरून सरकारवर संताप

दरम्यान, परभणीतील एका घटनेवरूनही भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली. १०८ क्रमांकावर वारंवार संपर्क करूनही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने आई आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा करत त्यांनी सरकारला जबाबदार धरलं. या घटनेनंतर सरकारवर कठोर कारवाईची मागणी करत जाधव यांनी “सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल झाला पाहिजे,” अशी आक्रमक भूमिका मांडली. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत महाराष्ट्र निष्काळजी प्रशासनाच्या हातात असल्याची टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून, त्यांच्या आगामी भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही प्रतिक्रिया तीव्र होत असल्याने राज्यातील आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा राजकीय संघर्षाच्या केंद्रस्थानी आला आहे.

Web Title: Bhaskar jadhav on manoj jarange maratha reservation devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Bhaskar Jadhav
  • CM Devendra Fadnavis
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
2

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
3

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश
4

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती तर मंत्र्यांना बांधावर जाण्याचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.