bjp girish mahajan target sanjay raut in nashik political news
नाशिक : राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला आहे. संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर गेले असून त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर त्यांनी निशाणा साधला आहे. यावर आता भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांना रोखठोक प्रत्युत्तर दिले आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीनदोस्त झाला असल्याचा घणाघात देखील त्यांनी केला आहे.
मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, त्यांचा पक्ष जमीन दोस्त होण्याच्या मार्गावर आहे. संजय राऊत संघटनात्मक बैठक घेऊन गेले. पुढच्या आठ दिवसात बघा, त्यांच्याकडे कोण राहणार कोण राहणार नाही. संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे स्वतः उद्धव ठाकरे देखील परेशान असतील. पण आता तो विषय आऊट ऑफ कंट्रोल झाला आहे. त्यांच्या बडबडीमुळे हा पक्ष आता मी सांगू शकत नाही, पक्ष संपवण्यासाठी संजय राऊत पुरेसे आहेत, असा घणाघात गिरीश महाजन यांनी केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तुम्ही नाशिकला दत्तक घेतले होते मात्र शहराची अवस्था बघून तुम्ही अनाथ आश्रम केला असा टोला राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. याबाबत गिरीश महाजन पुढे म्हणाले की, संजय राऊत यांच्या बद्दल उत्तर देण्यासाठी काही पुरेसे नाही. संजय राऊत यांना तुम्ही देखील जास्त प्रसिद्धी देत मनावर घेऊ नका. कोण अनाथ झाले कोणी दत्तक घेतले, लोक मतदान करतील. तुमची बडबड तुमचे विचार काय हे बघू. निवडणुकीला सामोरे या त्यानंतर आपण भेटू, असे थेट आव्हान गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांना दिले आहे.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार असून याबाबत देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेतली. अद्याप नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला नसल्यामुळे प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, पालकमंत्री पदावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला उत्तर दिले आहे. मी त्यावर काही वेगळं बोलू शकत नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे, मोठी जबाबदारी आहे त्या संदर्भात काम सुरू आहे, असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये आखाड्यातील महंताची उपस्थिती होती. याबाबत महाजन म्हणाले की, कालच्या बैठकीसाठी फक्त मंत्री महोदयांना आमंत्रण होते. आमदार खासदार यांना आमंत्रण नव्हते. काही आमदार मुख्यमंत्री आले त्यामुळे उपस्थित होते. पहिल्यावेळी असं घडलं की 13 चे 13 आखाड्याचे महंत आले होते. सर्वांसोबत चर्चा करून विनंती केली, आणि सर्व एकत्र येऊन बैठक घेतली मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. एका मताने सर्व ठराव पारित केले आहे, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.