Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप व मनसेची छुपी युती? अमित ठाकरेंनंतर आणखी एका उमेदवाराला पाठिंबा, प्रचार देखील करणार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. तसेच भाजपकडून मनसेच्या दोन उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 06, 2024 | 11:57 AM
BJP Devendra fadnavis support mns raj thackeray

BJP Devendra fadnavis support mns raj thackeray

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण रंगले आहे. नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असून बैठका देखील वाढल्या आहेत. प्रचारासाठी शेवटचे दोन आठवडे राहिले असल्यामुळे सभा व दौरे केले जात आहेत. उमेदवारांचे अर्ज दाखल झाले असून काही बंडखोरी करणाऱ्या नेत्यांनी अर्ज मागे देखील घेतले आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. यामध्ये आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. भाजपकडून मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला जात असल्यामुळे चर्चा वाढल्या आहेत.

राज्यामध्ये महायुतीसह महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरे जात आहे. तसेच तिसरी आघाडी देखील तयार झाली आहे. यामध्ये आणखी एका युतीची चर्चा आहे ती म्हणजे भाजप व मनसे या पक्षांची युती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मनसेकडून अनेक उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची उमेदवार चर्चेंची ठरली आहे. माहिम विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे यांना भाजपकडून पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे. महायुतीकडून शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर असताना देखील भाजपने अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. अमित ठाकरे आमच्या घरातीलच मुलगा असून आम्ही त्याच्यासाठी प्रचार करू अशी भूमिका घेतली. यामुळे मतभेद देखील झाले. यानंतर आता आणखी एका जागेवर भाजपने मनसेला पाठिंबा दिला आहे.

हे देखील वाचा : मनसेला शिवाजी पार्कवरील दीपोत्सव भोवणार? थेट निवडणूक आयोगाकडे करण्यात आली तक्रार

मनसेकडून शिवडी मतदारसंघामध्ये देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिवडी मतदारसंघामध्ये बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार व विद्यमान आमदार अजय चौधरी यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे चुरशीची लढाई होणार आहे. या मतदारसंघात महायुतीने उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे महायुती बाळा नांदगावकरांच्या पाठीमागे भाजप पाठिंबा देणार आहे, त्यामुळे आता भाजपकडून मनसेच्या दोन उमेदवारांना पाठिंबा दिला जाणार आहे. निवडणुकीपूर्वी राज ठाकरेंनी यांनी निवडणुकीनंतर मनसे सत्तेमध्ये असतील, असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

हे देखील वाचा : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी आज महाराष्ट्रात; सकाळी नागपुरात तर सायंकाळी मुंबईत सभा

गेल्या आठवड्यात भाजपचे दोन्ही नेते आशिष शेलार व प्रसाद लाड यांनी मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका मांडली होती. आशिष शेलार म्हणाले की, “अमित ठाकरे यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली पाहिजे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी बोलणार आहे. एक वेगळ्या पद्धतीचे महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थाने जपता येईल असं नातं आपण दाखवलं पाहिजे.”, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले की, अमित ठाकरे हा आमच्या कुटुंबातील मुलगा आहे. तो पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. अमित ठाकरे राज ठाकरेंचा मुलगा असला तरी आम्ही त्याला आमच्या मुलासारखाच समजतो आणि या निवडणुकीत आम्ही राज ठाकरे यांना मदत करावी यावर ठाम आहोत.

 

Web Title: Bjp gives support to mns amit thackeray and bala nandagoakar vidhansabha elections 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 11:57 AM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Assembly election 2024

संबंधित बातम्या

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?
1

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
2

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

Chitra Wagh: राहुल गांधींच्या ५४ परदेश दौऱ्यांचा हिशोब कुठे? ६० कोटींच्या खर्चावरून चित्रा वाघ यांनी काँग्रेसला घेरले
3

Chitra Wagh: राहुल गांधींच्या ५४ परदेश दौऱ्यांचा हिशोब कुठे? ६० कोटींच्या खर्चावरून चित्रा वाघ यांनी काँग्रेसला घेरले

नेपाळ बांगलादेशचे GenZ सत्ता बदलू शकतात तर भारतातसुद्धा… अरविंद केजरीवालांचे खळबळजनक विधान
4

नेपाळ बांगलादेशचे GenZ सत्ता बदलू शकतात तर भारतातसुद्धा… अरविंद केजरीवालांचे खळबळजनक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.