Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रायगडमध्ये भाजपला मिळणार ठाकरेंच्या शिवसेनेची साथ? जिल्हा परिषदेत सत्तेचे नवे गणित

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यामुळे या चर्चांना अधिक वेग आला आहे. रायगडमध्ये वेगळा 'पॅटर्न' राबवण्याचे संकेत देत सत्तेच्या समीकरणात मोठा बदल होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 18, 2026 | 09:36 AM
रायगडमध्ये भाजपला मिळणार ठाकरेंच्या शिवसेनेची साथ? जिल्हा परिषदेत सत्तेचे नवे गणित

रायगडमध्ये भाजपला मिळणार ठाकरेंच्या शिवसेनेची साथ? जिल्हा परिषदेत सत्तेचे नवे गणित

Follow Us
Close
Follow Us:

खालापूर / प्रवीण जाधव : जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवून राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे) एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या सूचक वक्तव्यामुळे या चर्चांना अधिक वेग आला आहे. रायगडमध्ये वेगळा ‘पॅटर्न’ राबवण्याचे संकेत देत सत्तेच्या समीकरणात मोठा बदल होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्हा परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने २१ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक आकडा नसल्याने त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

हेदेखील वाचा : महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, “कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने एकत्र निवडणूक लढवली होती आणि त्यांना मोठे यश मिळाले. त्यामुळे हाच फॉर्म्युला जिल्हा परिषदेतही वापरण्याची शक्यता आहे. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रायगड जिल्हा परिषदमधील सत्ता समीकरण असे…

१६ जागा राष्ट्रवादी (अजित पवार गट), १५ जागा भारतीय जनता पक्ष, ३१ जागा (स्पष्ट बहुमत) एकत्रित ताकद

(याशिवाय ठाकरे गटाची साथ मिळाल्यास सत्तास्थापनेसाठी मजबूत आघाडी तयार होऊ शकते.)

अपघाताची चौकशी करा

यावेळी तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत उपस्थित झालेल्या शंकांवरही भाष्य केले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी राष्ट्रवादीची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : Onion Farmers News: कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Web Title: Bjp may get support from thackeray shiv sena in raigad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • political leaders
  • Raigad Politics
  • Shivsena Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ
1

Maharashtra Politics: शिंदे गटाच्या ‘डिनर’ला ठाकरे गटाचे खासदार! ‘ऑपरेशन टायगर’ची पुन्हा चर्चा; राजकीय वर्तुळात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.