Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BJP Rajyasabha Candidate List : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; अभिनेत्रीला पुन्हा उतरवलं निवडणुकीच्या मैदानात!

BJP Rajyasabha Candidate List : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. उत्तराखंडमधून दिनेश आर्य आणि पश्चिम बंगालमधून अभिनेत्री रुक्मिणी मल्लिक उर्फ कोएल मल्लिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 16 ऑक्टोबरला 12 जागांसाठी मतदान होणार आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 04, 2026 | 04:02 PM
Parliament of India

Parliament of India

Follow Us
Follow Us:
  • उत्तराखंडमधून दिनेश आर्य यांना भाजपची उमेदवारी
  • पश्चिम बंगालमधून कोएल मल्लिक यांना तिकीट
  • 16 ऑक्टोबरला 12 राज्यसभा जागांसाठी मतदान
 

BJP Rajyasabha Candidate List : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने रविवारी, 4 ऑक्टोबर रोजी दोन नावांवर शिक्कामोर्तब केलं. उत्तराखंडमधून दिनेश आर्य आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी रुक्मिणी मल्लिक उर्फ कोएल मल्लिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

उत्तराखंडमधून दिनेश आर्य यांना संधी

भाजपने उत्तराखंडमधून दिनेश आर्य यांना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. आर्य हे नैनीतालचे रहिवासी असून त्यांनी यापूर्वी भाजपचे नैनीताल जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. सध्या ते उत्तराखंड सरकारमध्ये दर्जाप्राप्त राज्यमंत्री असून राज्यस्तरीय पेयजल अनुश्रवण परिषदेत उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत भाजपने उत्तराखंडमध्ये स्थानिक संघटनात्मक अनुभव असलेल्या नेत्याला संधी दिली आहे.

पश्चिम बंगालमधून कोएल मल्लिक यांना उमेदवारी

पश्चिम बंगालमध्ये भाजपने अभिनेत्री रुक्मिणी मल्लिक उर्फ कोएल मल्लिक यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे, कोएल मल्लिक याआधी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारीवर राज्यसभा खासदार झाल्या होत्या. त्यांनी एप्रिलमध्ये खासदार म्हणून शपथ घेतली होती आणि जुलैमध्ये राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता भाजपने त्यांना पुन्हा राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे.

Janatar Mantar Protest Breaking: ज्ञानेश कुमारांविरोधात राजकारण तापलं! जंतरमंतरवर आज पुन्हा मोठा राडा

कोएल मल्लिक या बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळासोबतच बंगाली मनोरंजन क्षेत्राचंही लक्ष लागलं आहे.

16 ऑक्टोबरला राज्यसभा निवडणूक

राज्यसभा निवडणुकीसाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशातील 10 जागा, उत्तराखंडमधील एक जागा आणि पश्चिम बंगालमधील एका जागेच्या पोटनिवडणुकीचा यात समावेश आहे. पश्चिम बंगालची जागा कोएल मल्लिक यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाली होती.

भाजपने सध्या दोन उमेदवारांची घोषणा केली असून उत्तर प्रदेशातील उर्वरित जागांसाठी पक्षाकडून आणखी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता भाजपच्या पुढील यादीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Uddhav Thackeray : ‘उद्या रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल,’ उद्धव ठाकरेंचा भाजपला थेट इशारा, गर्जना मोर्चातून घणाघात

Web Title: Bjp rajyasabha candidate list 2026 dinesh arya koel mallick vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • BJP
  • Rajyasabha Election

संबंधित बातम्या

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप
1

Ulhasnagar News : शिवसेना भाजपातील संघर्ष विकोपाला, पप्पू कलानी गँगस्टर तर रवींद्र चव्हाण मंचेकर गँगचे ऑपरेटर, शिवसेनेचा आरोप

‘अरे रोहित बाळा..,’ दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजप आमदाराचा रोहित पवारांवर हल्लाबोल, ‘तुझ्या कर्जतमध्ये येऊन काय करतो ते बघ’
2

‘अरे रोहित बाळा..,’ दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजप आमदाराचा रोहित पवारांवर हल्लाबोल, ‘तुझ्या कर्जतमध्ये येऊन काय करतो ते बघ’

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!
3

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने
4

District Bank Election: शिवसेना-राष्ट्रवादीला खिंडीत गाठत भाजपची ‘तिरकी चाल’; जिल्हा बँकेच्या आखाड्यात चार मंत्री आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.